नवाब मलिकांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हमाम मे सब…”

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचे ड्रग्ज पेडलरसोबत संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केले आहेत. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “तपास यंत्रणांचा इतक्या मोठ्या प्रमाणात गैरवापर महाराष्ट्राने पाहिलेला नाही. राजकारणाचा विचार केला तर हमाम मे सब नंगे है, त्यामुळे ज्यांची स्वतःची घरं काचाची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये,” असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही आरोप करण्यात होते त्यावरही भाष्य केले. “शरद पवारांवर आरोप करताना भाजपाच्या नेत्यांन लाज वाटली पाहिजे, असेही राऊतांनी म्हटले .
आमच्याही हातात दगड असू शकतात. मात्र, आम्ही संयम बाळगला आहे. कंबरेखालचे वाद आम्हाला नको आहेत, मात्र समोरच्याला हे करण्याची इच्छा असेल तर ते फार वाईट पातळीवर जाईल. असे राऊत म्हणाले.
तसेच शरद पवारांनी आतापर्यंत संस्कार असलेलं राजकारण केलंय,” असंही राऊत यांनी सांगितलं. आम्ही नवाब मलिकांच्या पाठिशी आहोत. तपास यंत्रणांचा गैरवापर करून सरकारमधील मंत्र्यांना त्रास दिला जातोय, असा आरोप राऊतांनी केला.





