न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीवरून संजय राऊतांची टीका; म्हणाले “…हा आरएसएस भाजपाचा अजेंडा”

Sanjay Raut | न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी आता काढण्यात आली असून तसा निर्णय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घेतला आहे. तसेच न्यायदेवतेच्या दुसऱ्या हातात असलेली तलवार देखील हटवण्यात आली असून तिथे राज्यघटनेचे पुस्तक म्हणजे संविधान असेल, असाही बदल त्यांनी केला आहे. भारतात नुकताच ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानंतरचा हा मोठा बदल झाला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हा निर्णय घेतला आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत ? Sanjay Raut |
‘न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन्याय करणाऱ्यांचा मुंडका उडवून टाकण्यासाठी असते. समोर किती मोठी व्यक्ती आहे, श्रीमंत आहे की शक्तिमान आहे ते पाहून मी न्याय करणार नाही यासाठी डोळ्यावर पट्टी असते. पण गेल्या चार वर्षात असं काही न्याय झाला नाही. न्यायालयाच्या काही लोकांनी भारतीय जनता पक्षाला मदत करायचं ठरवलं आहे. त्यासाठी त्यांनी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढली डोळ्यावरील पट्टी काढली,” अशी टीका संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केली.
उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा Sanjay Raut |
“या देशात संविधान बदलायचं संपूर्ण कारस्थान रचण्यात आलं होतं. या देशाच्या जनतेने संविधान वाचवण्यासाठी मोदींचे बहुमतच काढून टाकले. या विषयातून मार्ग काढण्यासाठी आणि लोकांच्या मनातील भावना संविधानासंदर्भात पुसून काढण्यासाठी न्यायालयाच्या काही लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मदत करण्याचे ठरवलेले दिसते,” असेही त्यांनी म्हंटले.
“आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा. सध्या उघड्या डोळ्यांनी खून, बलात्कार पाहिले जात आहे. मोदीजी आणि अमित शाह तसेच करत आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील तसेच करत आहेत. उघड्या डोळ्यांनी सगळं करता आहेत आणि करायला लावत आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली. हातातली तलवार देखील काढून टाकली. संविधान हातात दिले. पण संविधानाचे रक्षण आणि संविधानानुसार काम होत आहे का?,” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हा आरएसएस भाजपाचा अजेंडा Sanjay Raut |
“गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात संविधान विरोधी सरकार चालू आहे हे सरकार रोज भ्रष्टाचार, अत्याचार करत आहे. तुम्ही शिवसेना राष्ट्रवादीबाबत निर्णय देऊ शकला नाही. हा आरएसएस भाजपाचा अजेंडा आहे तुम्ही एका पक्षाचा प्रचार करत आहात. ईव्हीएम संदर्भात घोटाळा होतो परंतु तुम्ही क्लीन चीट दिली आहे. कायद्याचा कारभार करून विरोधी पक्षाला संपवले जात आहे आणि हे तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहात हा प्रोपोगंडा आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा:





