संजय राऊत यांचं सर्वांत मोठं विधान; “काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांचीच इच्छा..” महाविकास आघाडीत मनसेची एन्ट्री होणार?

Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर ठाकरे बंधूंची राजकीय युती होणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांतील नेत्यांनी तसे स्पष्ट संकेत त्यांच्या विधानून दिलेले आहेत.
परंतु, अद्यापर्यंत दोन्ही भाऊ राजकीय दुष्ट्या एकत्र आलेले नाही. त्यांनी राजकीय दृष्या एकत्र यावे अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. अशातच आता उबाठाचे नेते संजय राऊत यांनी पडद्यामागे नेमकं काय घडतयं यावर मोठं भाष्य करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची इच्छा काय आहे याबाबत मोठी माहिती दिली आहे.
शिवसेना आणि मनसेची राजकीय युती झाल्यास मनसे पक्ष महाविकास आघाडीत येणार का? या प्रश्नावर चर्चा सुरू झाली असातना राज ठाकरेंबाबतचा निर्णय दिल्लीत होईल, असे काँग्रेसने म्हटले आहे, तर राज ठाकरे यांनी देखील काँग्रेसबाबत भूमिका घेतली असल्याची मोठी माहिती आज उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
काँग्रेसला सोबत घेणं गरजेच
त्यामुळे मनसेचा समावेश महाविकास आघाडीत करण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांचा आघाडीत समावेश करायचा असल्यास उद्धव ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्याशी चर्चा करू शकतात. मी देखील राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा करू शकतो, असे संजय राऊत म्हणाले. स्वत : राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणं गरजेच आहे, अशी सर्वात मोठी माहिती संजय राऊत यांनी दिली. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचेही राऊतांनी स्पष्ट केले.
तीच भूमिका राज ठाकरे यांची
प्रत्येकाचे या राज्यात एक स्थान आहे, शिवसेना ( ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांचे, डाव्या पक्षांचे स्थान आहे. तसेच काँग्रेस हा देखील महाराष्ट्रातील एक महत्वाचा पक्ष आहे. काही निर्णय घेताना शिष्ट मंडळात काँग्रेसचा समावेश होणे गरजेचा आहे ही आमची भूमिका आहे. तीच राज ठाकरे यांची देखील आहे.





