Sanjay Raut: ‘टिपू सुलतानाला नायक मानणाऱ्या पाकिस्तासोबत क्रिकेट का खेळता?’; संजय राऊतांचा भाजपला सवाल
Sanjay Raut: टिपू सुलतानाला नायक आणि महान योद्धा मानणाऱ्या पाकिस्तासोबत भारत क्रिकेट खेळण्याचा धिक्कार का करत नाहीत, संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut: मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावल्यावरून वाद निर्माण झाला आहे. याचदरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धा असल्याचे विधान केले होते.
त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप प्रचंड आक्रमक झाला आहे. यावर संजय राऊत यांनीही, टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नसल्याचे देखील स्पष्ट केले.
तसेच टिपू सुलतानाला नायक आणि महान योद्धा मानणाऱ्या पाकिस्तासोबत भारत क्रिकेट खेळण्याचा धिक्कार का करत नाहीत, असा सवालही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानाचे पुतळे आहेत, अभ्यासक्रमात त्याचे धडे आहेत. तो पाकिस्तानचा नायक आणि योद्धा आहे. मग त्याला नायक मानणाऱ्या पाकिस्तानसोबत भारत क्रिकेट खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्कार केला पाहिजे. Sanjay Raut:
आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेटचा धिक्कार करतो, असे फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी सांगायला पाहिजे. पण भाजप तसे करणार नाही कारण भाजप ढोंगी आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली. Sanjay Raut:
‘भारत आणि पाकिस्तान सामन्यावर सर्वाधिक जुगार खेळला जातो’
“पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटमधून सगळ्यांना पैसे मिळतात. भारत आणि पाकिस्तान सामन्यावर सर्वाधिक जुगार खेळला जातो. याच बेटिंगमधून पाकिस्तानला 25 हजार कोटी मिळाले. यामधील काही वाटा सरकारलाही मिळतो. हाच पैसा मग पुलवामा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरला जातो. हे पाप भाजपचं आहे.
भारत-पाक क्रिकेट सामन्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची ढोंग उघडी पडली आहेत. एकतरी भाजपवाला सांगतोय का, पाकिस्तानसोबत खेळू नका. जो पाकिस्तान टिपू सुलतानाला नायक मानतो, त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट कसं खेळू शकता?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. Sanjay Raut:
हेही वाचा:






