Sanjay Raut: “आई-बाळाची ती हाक, डोळ्यातील भीती आणि पोलिसांचा तो पाशवी हात…”; आंदोलनादरम्यानचा ‘तो’ फोटो शेअर करत राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
Sanjay Raut: 'राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे, हे दिसते'

Sanjay Raut: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. विरोधी पक्षासह सीजेपीकडून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. काल दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर देखील आंदोलन करण्यात आले. मात्र इथेही पोलिसांनी रोखले आणि थेट आंदोलकांना उचलून गाडीत टाकून ताब्यात घेतले जात होते. (Sanjay Raut)
यावेळी एका महिलेला तिच्या लहान मुलासोबत गाडीत पोलिस व्हॅनमध्ये महिला पोलिस कोंबतानाचा फोटो एका वृत्तपत्राने छापला आहे. हा फोटो शेअर करत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. (Sanjay Raut)
महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड (Sanjay Raut)
संजय राऊत यांनी हा फोटो सोशल मीडियामध्ये शेअर करत हा फोटो म्हणजे महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयीपणा समोर आणल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “राजू शिंदे (HT मुंबई) यांच्या छायाचित्राने महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला आहे. आई बाळाची ती हाक, डोळ्यातील भीती आणि पोलिसांचा तो पाशवी हात, हे फक्त छायाचित्र नाही, हे लोकशाहीच्या बिगडलेल्या आरोग्याचं निदान आहे. (Sanjay Raut)
हृदयद्रावक चीड आणणारं आणि आयकॉनिक. जेव्हा शांततेत आवाज उठवणारे आदिवासी विद्यार्थी किंवा नागरिक फरपट पोलीस बसवर चढवले जातात, तेव्हा गृहखात्याची कायदा-सुव्यवस्था ही निर्दयी आणि भावनाशून्य बनते. राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे, हे दिसते. देवेंद्र फडणवीस, मोदी वगैरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं आहे, ते या चित्रातून दिसतं. देशातील प्रत्येक वर्तमानपत्राने हे चित्र पहिल्या पानावर प्रसिद्ध केलं पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी १२ ऑक्टोबर रोजी इंडिया ब्लॉकतर्फे आणखी एका आंदोलनाची घोषणा केली. इंडिया ब्लॉक सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढणार आहे. या मोर्चात अनेक प्रमुख नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. शहराबाहेरील खासदारही या आंदोलनात सामील होण्यासाठी येत आहेत. (Sanjay Raut)
The Dirty Picture 2: ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाचा सिक्वेल येणार; एकता कपूरने दिली अपडेट





