CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे मुंबईतही आंदोलन; ज्ञानेश कुमार यांचा ‘निरोप समारंभ’ साजरा केला जाणार
CJP Protest: नागपुरामध्ये पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी देखील हे आंदोलन सुरूच असून आंदोलकांची धरपकड केली जात आहे. दिल्लीतील या आंदोलनाची धग आता देशाच्या इतर प्रमुख शहरातही उमटताना दिसत आहे. पुणे, मुंबई आणि नागपुरात देखील सीजेपीच्या वतीने आंदोलनाची हाक दिली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आज शिवाजी पार्कवर दुपारी चार वाजता सीजेपीच आंदोलन होणार आहे. या आंदोलनातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा ‘निरोप समारंभ’ साजरा केला जाणार आहे. दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही सीजेपीच आंदोलन होणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शिवाजी पार्कवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुसरीकडे, ऑगस्ट क्रांती मैदान तसेच नाना चौक परिसरात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. आंदोलनकर्त्यांविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दिल्लीतील आंदोलन सुरू असेपर्यंत मुंबईतही आंदोलन सुरू राहणार, असे तुषार गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
नागपुरातही सीजेपीच्या वतीने आंदोलनाची हाक
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपुरातही सीजेपीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मात्र या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही असल्याची माहिती आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे आज (11 ऑक्टोबरला) संविधान चौकात आंदोलन प्रस्तावित होते.
नागपुरात पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली गेली आहे. संविधान चौक परिसरातील विधानभवन, आरबीआय आणि इतर संवेदनशील ठिकाणांचा दाखल देत परवानगी नाकारल्याचे पत्रात उल्लेख केला आहे.
हेही वाचा:
Yavatmal : यवतमाळ जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज महासंग्राम; २३ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात





