Sanjay Raut : “मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली”; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट
Sanjay Raut : दिल्लीत पुन्हा एकदा जंतरमंतरवर CJP च्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शनं

Sanjay Raut : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. दोन निवडणूक आयुक्तांचा ज्ञानेश कुमारांनी एसआयआरसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला या पद्धतीने विरोध होता, हे समोर येताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने मुंबईसह दिल्लीत आंदोलन केले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
याचदरम्यान काल रविवारी इंडिया गेट ते जंतर मंतर मोर्चा काढण्यात आला होता. या मार्चमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले. या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा यांना ताब्यात घेतलं.
दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा हिला ताब्यात घेतल्यानंतर एका खासगी गाडीतून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विद्यार्थ्यांनी या कारला घेराव घालून रस्ता अडवला. काही विद्यार्थ्यांनी या कारची हवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांचे एक पथक या कारच्या भोवती वेढा देऊन उभे राहिले होते आणि आंदोलकांना नेहा बोरा हिच्यापर्यंत पोहोचून देत नव्हते.
दिल्ली ची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे ; मोदी शहा वैगरेंची दहशत या पोरानी नष्ट केली
नेहा बोरा यांना ज्या गाडीत बंदिस्त केलं होतं, त्याच गाडीला पोरांनो खेळणं बनवून टाकलं! 😂
दिल्ली पोलीस पूर्णपणे हतबल झालेत. विद्यार्थ्यांनी गाडी उलट्या दिशेनं पळवून नेली, पोलीस काहीच करू शकले नाहीत.
किमान चार वेळा गाडी १०० मीटर पुढे आणि १०० मीटर मागे धावत राहिली.
अमीत शहा भूमिगत आहेत;
थांबा ; आणखी बरच काही बघायचं आहे!
महाराष्ट्रत आज ट्रेलर दिसला आहे!
जय महाराष्ट्र!
https://t.co/rgQ6YanV8B— Sanjay Raut (@rautsanjay61) October 4, 2026
त्यानंतर दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा यांना लांब अंतरावर नेऊन सोडले. तिच्याजवळचा फोन आणि बॅगही काढून घेण्यात आली होती. या सगळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
संजय राऊत यांची पोस्ट
यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एक सूचक पोस्ट शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊत यांनी लिहिले की, “दिल्लीची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मोदी-शहा वगैरेंची दहशत या पोरांनी नष्ट केली आहे. नेहा बोरा यांना ज्या गाडीत बंदिस्त केलं होतं, त्याच गाडीला पोरांनो खेळणं बनवून टाकलं!
दिल्ली पोलीस पूर्णपणे हतबल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी गाडी उलट्या दिशेनं पळवून नेली, पोलीस काहीच करू शकले नाहीत. किमान चार वेळा गाडी १०० मीटर पुढे आणि १०० मीटर मागे धावत राहिली”, अशा शब्दांत राऊतांनी सीजेपीच्या आंदोलनावरून मोदी सरकारला टोला लगावला आहे.
या पोस्टमध्ये संजय राऊतांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधत म्हंटले की, “अमित शाह भूमिगत आहेत. थांबा, आणखी बरंच काही बघायचं आहे. महाराष्ट्रत आज ट्रेलर दिसला आहे”, असं राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून मध्यभागी एका गाडीला आंदोलकांनी अडवल्याचं दिसत आहे. दरम्यान, मुंबईत शिवाजी पार्क येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झाल्यानंतर पाठोपाठ रविवारी दिल्लीत देखील पुन्हा एकदा जंतरमंतरवर CJP च्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली.
ठाकरे बंधुंचा गर्जना मोर्चा
रविवारी, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपसाठी ‘शस्त्र’ म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीची विशेष सखोल पुनर्तपासणी (SIR) रद्द करण्याची मागणी केली.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांनी मोर्चा काढला. या रॅलीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख उपस्थित होते.
हेही वाचा:





