Sanjay Raut : संजय राऊतांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा निकाल; काय आहे नेमकं प्रकरण?
Sanjay Raut : माझगाव कोर्टाने २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांची कैद अशी ही शिक्षा होती. या शिक्षेला संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मीरा भाईंदर शौचालय घोटाळ्याबाबत आरोप असल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने निकाल देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानी प्रकरणी संजय राऊत यांना माझगाव कोर्टाने शिक्षा सुनावली होती. त्यांना माझगाव कोर्टाने २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांची कैद अशी ही शिक्षा होती. या शिक्षेला संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.
या आव्हानानंतर गेल्या अनेक दिवसांपासून युक्तीवाद सुरु आहे. अखेर न्यायालयाने संजय राऊत (Sanjay Raut ) यांची या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. Sanjay Raut
काय आहे नेमकं प्रकरण? Sanjay Raut
मीरा रोड येथील शौचालय घोटाळ्याचे हे प्रकरण होतं. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याचे आरोप केले होते. या आरोपांनंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता.
Devdas Movie: ‘मार डाला’च्या शूटिंगवेळी माधुरी-शाहरुख जखमी! भव्य गाण्यामागचं लपलेलं दुःख उघड
या प्रकरणी खालच्या माजगाव कोर्टात सुनावणी होऊन संजय राऊत (Sanjay Raut ) यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयानं संजय राऊत यांना १५ दिवसाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर संजय राऊत यांना दंडही ठोठावण्यात आला होता.
या निकालाविरूद्ध संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी सत्र न्यायालयानं संजय राऊत यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता करत त्यांना दिलासा दिला आहे. Sanjay Raut






