मुंबई – मीरा रोड परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. सोमवारी याच परिसरात राम मंदिराच्या उद्घाटन आणि रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. तेव्हापासून येथे तणावाचे वातावरण आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने अवैध बांधकामांवर ही कारवाई केली आहे.
#WATCH | Illegal structures and encroachments razed by bulldozers in the Naya Nagar area of Mira Road where Ram Mandir Pranpratishtha celebrations were stone pelted. After instructions from the Maharashtra government action is being taken by Municipal Corporation with the help of… pic.twitter.com/gx0RAhB8uH
— ANI (@ANI) January 23, 2024
सोमवारी येथे दोन समाजात हाणामारी झाली होती. दगडफेकीत अनेक जण जखमीही झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता मीरा रोडच्या नया नगर भागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. या भागात तणावाचे वातावरण पाहता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या भागात 15 बेकायदा बांधकामे पाडण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बुलडोझरची कारवाई सर्वप्रथम उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने सुरू केली होती. त्यानंतर अनेक राज्य सरकारांनी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी ही पद्धत अवलंबली. 22 जानेवारी रोजी मुंबईत प्राणप्रतिष्ठेदरम्यान मिरवणूक काढण्यात आली होती. त्याचवेळी नया नगर परिसरात दगडफेक सुरू झाली. मिरवणुकीत कार, दुचाकी आणि भगवे झेंडे होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, जर कोणी कायदा मोडला तर त्याला कठोर शिक्षा होईल. आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले होते. सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपी पकडले जातील. काही लोक घोषणाबाजी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर दोन समाजात वादावादी झाली. हाणामारी झाल्याचे पाहून पोलिस तेथे पोहोचले आणि संशयितांना ताब्यात घेतले. पुढील कारवाई सुरु आहे. अशातच आज पालिकेने येथील बेकायदा बांधकामांवर बुलडोजर चढवून कारवाई सुरु केली आहे.