Rohit Pawar : ‘दादांना न्याय मिळवून द्या’, रोहित पवारांसह बारामतीकर रस्त्यावर, पोलीस ठाण्याबाहेर गर्दी
Rohit Pawar At Baramati Police Station: पोलिस स्टेशनबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केली असून एफआयआर दाखल करून घेण्यासाठी बारामतीकर आक्रमक झाले आहेत.

Rohit Pawar At Baramati Police Station: अजित पवार यांच्या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच आता अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार आज बारामतीतील पोलिस ठाण्यात जाऊन अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे.
याआधी रोहित पवार मुंबईमध्ये पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली नाही. त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा बारामतीत वळवला आहे.
यावेळी रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवार हे देखील आहेत. बारामती पोलिस स्टेशनबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केली आहे. एफआयआर दाखल करून घेण्यात यावी यासाठी बारामतीकर आक्रमक झाले आहेत.
यावेळी ‘एकच वादा अजितदादा’, ‘अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे’, ‘परत या परत या अजितदादा परत या’, अशा घोषणा बारामतीकर देत आहेत. आमच्या दादांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती बारामतीकरांनी केली आहे.
पोलीस आणि रोहित पवार यांच्यात बाचाबाची Rohit Pawar At Baramati Police Station
अजित पवार विमान अपघातप्रकरणी DGCA आणि VSR कंपनीविरोधात FIR दाखल करुन घेण्यास मरीन लाईन्स पोलिसांनी नकार दिला, तिथं पोलीस आणि रोहित पवार यांच्यात बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळालं. गुन्हा दाखल न करुन घेतल्याने मरीन लाईन्स पोलिसांवर कुणाचा दबाव आहे? असा सवाल आमदार रोहित पवारांनी केला. ज्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. Rohit Pawar At Baramati Police Station
रोहित पवार बारामतीत येत गुन्हा दाखल करत असतानाच त्यांचे वडील राजेंद्र पवार हेसुद्धा त्यांच्या साथीला असून, बारामतीकरांनीसुद्धा नेहमीप्रमाणंच पवार कुटुंबाला साथ देत या अपघाताच्या चौकशीची, एफआयआर दाखल करून घेण्याची मागणी केली आहे. बारामती पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या संख्येनं अजित पवार समर्थक पोहोचले आणि तिथं घोषणाबाजी करत फिर्याद दाखल झालीच पाहिजे अशीच ठाम भूमिका मांडली. Rohit Pawar At Baramati Police Station:
हेही वाचा:
Ajit Pawar: “आम्हीही दुःखी आहोत, पण सुनेत्रा पवार यांचं दुःख डोंगराएवढं”…नाना पाटेकर भावूक





