Sanjay Raut : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत दैनिक ‘सामाना’तील रोखठोक या त्यांच्या सदरातून सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडत असतात. मात्र, आज प्रकाशित झालेल्या त्यांच्या रोखठोक सदराची जोरदार चर्चा होत असून, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सविस्तर विश्लेषण करत महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे कोणती आहेत यावर भाष्य केले आहे. यावशिवाय राऊतांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उद्धव व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते, असे म्हटल्याने त्यांच्या वक्तव्यावरून त्यांनी ठाकरे बंधूंचे कान टोचल्याची चर्चा रंगली आहे. या सगळ्या चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. मी कान टोचले नाहीत, तर भावना व्यक्त केल्या असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उद्धव व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. मोदी, शहा, फडणवीस-शिंदे यांनी राजकारणाचे पूर्ण व्यापारीकरण केले हे खरे. तरीही त्यांचेही लोक मोठ्या प्रमाणात पराभूत झाले व सुनीता चव्हाण यांच्यासारखे साधे उमेदवार आजही लोक निवडून देतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल या निवडणुकांचे विश्लेषण करताना संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या शिवसेनेची पीछेहाट राजकीय समतोल बिघडवणारी आहे. शिवसेनेची पीछेहाट म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या विचारांची पीछेहाट. असे म्हटले आहे. शिंदे यांचे नेतृत्व हे ठाकरेंपेक्षा मोठे नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पीछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधान्यांना दोष देणे चुकीचे आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. Sanjay Raut यासोबतच संजय राऊतांनी महायुतीच्या विजयाचे गमक काय आहे याविषयी देखील विश्लेषण केले आहे. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाने ‘बुथ’ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. जेथे कार्यकर्ते नाहीत तेथे इतर पक्षांतले लोक सरळ विकत घेतले. निवडणुका जिंकताना कोणतेही सोवळे भाजप पाळत नाही. भाजपने ग्रामीण महाराष्ट्रातले सर्व ‘तालेवार’ लोक, कारखानदार आपल्या पक्षात ओढले. त्यांच्या बळावर ते निवडणुका जिंकत आहेत. फडणवीस आणि शिंदेबद्दल म्हणाले… फडणवीस स्वतः निवडणुकीत उतरले. भाजपचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरले. पक्षाचा कार्यक्रम राबवला. निवडणूक लढवणे हाच एककलमी कार्यक्रम त्यांनी राबवला. असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते व त्यानुसार ते स्ट्रॅटेजी’ ठरवतात. त्यासाठी त्यांनी पैशांचं बळ वापरलं, असा गंभीर आरोपही केला आहे. विरोधकांनी निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत. महाविकास आघाडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळाले नाही. जी मोहिम निवडणुका जिंकण्यासाठी अवलंबली गेली पाहिजे त्यावर महायुतीच्या घटक पक्षांनी फोकस केला असल्याचे दिसते. मुंबई व इतर काही मोजक्याच महत्वाच्या ठिकाणी आघाडीने लक्ष घातले असल्याचे दिसून आले. यावर संजय राऊतांनी बोट ठेवत मुंबई व इतर काही महानगरपालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत, असे मोठं विधान केले आहे. हेही वाचा : Sanjay Raut: ‘टिपू सुलतानाला नायक मानणाऱ्या पाकिस्तासोबत क्रिकेट का खेळता?’; संजय राऊतांचा भाजपला सवाल