“संतोष देशमुखांनी भ्रष्टाचाराला वाचा फोडल्याने त्यांची हत्या” ; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचा आरोप

Sanjay Raut on Santosh Deshmukh case । राज्यात सध्या बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने सर्वत्र गोंधळ घातला आहे. या प्रकरणामुळे तर राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु आहे. आता याच प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. त्यासोबतच त्यांनी अनेक मुद्दावरून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
…म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली Sanjay Raut on Santosh Deshmukh case ।
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना,”छत्तीसगडमधील बस्तरमध्ये शुक्रवारी सेप्टिक टँकमध्ये तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक केली आहे. याचबरोबर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर मालमत्तेवर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर कारवाई करत, ती जमिनदोस्त केली आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना “तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांनी रस्त्याच्या बांधकामातील भ्रष्टाचार समोर आणला होता. असेच महाराष्ट्रात होत आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणही याच प्रकरणाशी साम्य आहे. सरपंच संतोष देशमुख यांनी भ्रष्टाचारच्या विरोधात आवाज केला आणि त्यातूनच त्यांची हत्या झाली. हे संपूर्ण देशात सुरू आहे. ही कसली लोकशाही? असा सवाल करत संजय राऊतांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.
त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीअगोदर केली होती यातून आम्ही कसे तारक आहोत अशी दवंडी दिल्या गेली. पण महाराष्ट्रच सरकार ही आता फार वेगाने काम करत आहे असे दिसत नाही. ज्यांनी ही घोषणा दिल्लीतून केली, इथे पेढे वाटल्या गेले, पण अद्याप GR काही निघाला नाही. मग हा राजकीय जुमला होता का? असाथेट सवाल करत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या घोषणेवरही संशय व्यक्त केला.
‘त्या’ घटनेवर फडणवीस, श्रीकांत शिंदे गप्प का? Sanjay Raut on Santosh Deshmukh case ।
दरम्यान, कल्याण येथील अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यावरून संजय राऊत म्हणाले की, कल्याण, अंबरनाथ हा मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात लुटमार, बलात्काराचे प्रकार वाढले आहेत. गुंडांना अभय दिलं जातंय. आणि येथील खासदार मतदारसंघात फिरतही नाहीत. बलात्कार, खून करणारे हे बीड आणि कल्याणमध्येच का असतात? देवेंद्र फडणवीस आणि ते खासदार गप्प का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला.





