संजय राऊत स्पष्टच बोलले ; म्हणाले,”काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, आमच्यामुळंच…”

Sanjay Raut on congress । महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच वादाची ठिणगी पडणार असल्याचे दिसत आहे. कारण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळं काँग्रेसच्या जागा वाढल्यात “असे मोठे वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे वरीष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
जो जिथं जिंकणार त्यालाच… Sanjay Raut on congress ।
महाविकास आघाडीची आज जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे. जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिला जाईल असे स्पष्टपणे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच काही मतभेद झालेच तर पुन्हा बैठक होईल, वरिष्ठ नेते एकत्र बसतील असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात देखील राऊतांना विचारण्यात आलं. यावेळी राऊत म्हणाले की, तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते. कारण ती विरोधकांची मत फोडते असं ते म्हणाले.
मोदींनाच कसलं उद्घाटन करतात माहिती नसतं Sanjay Raut on congress ।
त्यातच आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यावर देखील संजय राऊतांनी टीका केली. मोदी येतात, मोदी जातात. ते कसलं उद्घाटन करतात, त्यांनाच माहिती नसतं असा टोला राऊतांनी लगावला. उद्योगांचं काय? आजही इथले उद्योग गुजरातला जातायत. जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याच्या दर्जा देण्याची मागणी केलीय. मग आमचा जो भाग गुजरातला नेलाय, तोही परत द्या असे राऊत म्हणाले. .





