संजय दत्तचा ‘केडी-द डेव्हिल’ चित्रपटातील फर्स्ट लुक समोर

KD – The Devil Film Sanjay Dutt Look | अभिनेता संजय दत्त लवकरच एका कन्नड चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘केडी-द डेव्हिल’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाबाबत त्याचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. नुकतेच संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटातील त्याची पहिली झलक समोर आली आहे.
या चित्रपटात तो धक देवाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा भाग बनल्याबद्दल संजय दत्त म्हणाला, ‘केडी-द डेव्हिल’चा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. कन्नड दिग्दर्शक प्रेम सरांनी चित्रपटाची ज्या प्रकारे कल्पना केली आहे, ते मला खूप आवडले.’ दरम्यान, संजय दत्त चित्रपटाच्या पोस्टरमध्ये टपोरी स्टाईलमध्ये दिसत आहे. यात तो मोठ्या दाढी आणि मिशासह दिसत आहे. त्याने डोळ्यांवर चष्मा घातला असून डोक्यावर तिरकस पोलिसांची टोपी आणि हातात दंडुका घातल्याचे पाहायला मिळत आहे. KD – The Devil Film Sanjay Dutt Look |
View this post on Instagram
‘केडी-द डेव्हिल’मध्ये संजय दत्तशिवाय शिल्पा शेट्टी, नोरा फतेही, रमेश अरविंद, व्ही रविचंद्रन आणि ध्रुव सर्जा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 1970 च्या दशकातील बंगलोरच्या सत्य घटनांवर आधारित आहे. हा चित्रपट 13 नोव्हेंबर रोजी तामिळ, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. KD – The Devil Film Sanjay Dutt Look |
दरम्यान, यश स्टारर ‘केजीएफ’मध्ये संजयने आपल्या अभिनयाने खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे ‘केडी द डेव्हिल’ चित्रपटाकडून देखील चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटातील संजय दत्तचा पहिला लुक समोर येताच प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हेही वाचा:
“राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या…” ; उत्तम जानकरांची अजित पवारांवर टीका





