Raosaheb Danve | Sanjana Jadhav – माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. हा अपघात धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे घडला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संजना जाधव या आगामी विधानसभा निवडूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान त्यांनी जिल्ह्यात नागरिकांच्या गाठीभेटी वाढवल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजना जाधव या आपल्या कारने धुळे-सोलापूर महामार्गावरुन जात होत्या. चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव जवळ त्यांची गाडी आली असता समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळ गाठून पुढील कारवाई सुरू केली आहे.