Sanjana Ganesan : ‘तुझे घर की याद नहीं आई जस्सी?’ यॉर्कर किंग बुमराहला पत्नी संजनाने मजेशीर मीम शेअर करत केलं क्लीन बोल्ड
Sanjana Ganesan : बुमराह मैदानात फलंदाजांच्या दांड्या गुल करण्यासाठी ओळखला जातो, पण घरच्या खेळपट्टीवर मात्र त्याची पत्नी संजना गणेशनने त्यालाच क्लीन बोल्ड केले.

Sanjana Ganesan Share Dhurandhar Viral Meme for bumrah : मैदानावर आपल्या घातक यॉर्करने फलंदाजांच्या दांड्या उडवणारा जसप्रीत बुमराह सध्या स्वतःच्याच पत्नीच्या गुगलीवर ‘क्लीन बोल्ड’ झाला आहे. संजना गणेशनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘धुरंधर’ चित्रपटातील एका प्रसिद्ध संवादाचा वापर करून बुमराहची फिरकी घेतली आहे. तिची ही पोस्ट सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
‘धुरंधर’ मीम शेअर करत संजनाने बुमराहची घेतली फिरकी –
संजना गणेशनने इंस्टाग्राम स्टोरीवर एक मजेशीर मीम शेअर केली आहे. जेव्हा कधी जसप्रीत बुमराह ‘बॉयज नाईट’ (मित्रांसोबत बाहेर जाणे) बद्दल विचार करतो, तेव्हा संजना त्याला धुरंधर चित्रपटातील पात्राचा आधार घेत म्हणते, “तुझे घर की याद नहीं आई जस्सी?” (तुला घराची आठवण नाही आली का जस्सी?). संजना अनेकदा सोशल मीडियावर बुमराहला अशा प्रकारे चिडवत असते, ज्याचा चाहते भरभरून आनंद घेतात.
Sanjana Ganesan instagram story 😂 pic.twitter.com/tKk60UaMif
— Cricket Central (@CricketCentrl) March 24, 2026
मैदानातील जोडी आणि कुटुंबाचा प्रवास –
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकले असून त्यांना अंगद नावाचा एक मुलगा आहे. संजना अनेकदा स्टेडियममध्ये बुमराहची मुलाखत घेताना दिसते, जिथे या दोघांमधील हलकीफुलकी नोक-झोक चाहत्यांना विशेष भावते. बुमराहच्या यशात संजनाचा मोठा वाटा असून ती नेहमीच त्याच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करत असते.
टी-२० विश्वचषकातील हिरो आता आयपीएलसाठी सज्ज –
बुमराह नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताच्या विजयाचा हिरो ठरला होता. त्याने ८ सामन्यांत १४ विकेट्स घेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले होते. विशेषतः अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेत तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता. आता हाच ‘यॉर्कर किंग’ मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला असून आयपीएलच्या १९ व्या हंगामात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.





