BCCI Profit : आयपीएल २०२६ पूर्वी बीसीसीआयला लागली लॉटरी! RCB राजस्थान रॉयल्सच्या विक्रीतून मिळाले सुमारे १६०० कोटी
BCCI Profit : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच बोर्डाला हजारो कोटींचा नफा झाला आहे, तो कसा झाला जाणून घेऊया.

BCCI Profit 1599.65 crore from RCB RR Sale : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआय (BCCI) च्या तिजोरीत पुन्हा एकदा पैशांचा पाऊस पडला आहे. आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच बोर्डाला हजारो कोटींचा नफा झाला असून, दोन मोठ्या संघांच्या मालकी हक्कांच्या विक्रीमुळे हा चमत्कार घडला आहे.
आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी २४ मार्च हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन दिग्गज फ्रँचायझींना नवे मालक मिळाले आहेत. या दोन संघांच्या विक्रीतून बीसीसीआयच्या खात्यात तब्बल १५९९.७५ कोटी रुपये जमा होणार आहेत.
बीसीसीआयला एवढा पैसा कसा मिळणार?
Rajasthan Royals has been sold for $1.63B to a US-based group led by Kal Somani.
Royal Challengers Bengaluru goes for $1.78B to a consortium led by Aditya Birla Group.Share your thoughts!
Follow @cricbiteslive for more updates.#IPL #IPL2026 #RCB #RR #Cricbites pic.twitter.com/ZHBEEOv8oG
— Cricbites (@cricbiteslive) March 25, 2026
आयपीएलच्या नियमानुसार, जर एखाद्या टीमचा मालक बदलला, तर विक्रीच्या एकूण रकमेपैकी ५ टक्के शुल्क (Transfer Fee) बीसीसीआयला द्यावे लागते. आरसीबीचा व्यवहार १६,७०६ कोटी रुपयांना झाला असून, त्याचे ५ टक्के म्हणजेच ८३५.३ कोटी रुपये बोर्डाला मिळतील. तसेच राजस्थान रॉयल्स १५,२८९ कोटींना विकली गेल्याने तिथून ७६४.४५ कोटी रुपये बीसीसीआयला मिळतील. अशा प्रकारे केवळ दोन व्यवहारांतून बोर्डाला १५९९.७५ कोटींचा नफा झाला आहे.
आरसीबी ठरली जगातील सर्वात महागडी टीम –
आरसीबीची विक्री १.७८ अब्ज डॉलर्समध्ये झाली असून, ती आता इतिहासातील सर्वात महागडी क्रिकेट टीम बनली आहे. आदित्य बिर्ला ग्रुप, अमेरिकन गुंतवणूकदार डेव्हिड ब्लिट्झर आणि ब्लॅकस्टोन फर्म यांनी मिळून हा संघ खरेदी केला आहे. दुसरीकडे, कल सोमाणी यांच्या ग्रुपने राजस्थान रॉयल्स १.६३ अब्ज डॉलर्सला खरेदी करत दुसरे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, राजस्थान रॉयल्सचा हा करार आयपीएल २०२६ नंतर लागू होईल, तोपर्यंत मनोज बदाले हेच मालक राहतील.
या विक्रमी व्यवहारांमुळे आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू आता जागतिक स्तरावर फुटबॉल आणि बास्केटबॉल लीगच्या तोडीस तोड पोहोचली आहे.





