संग्राम थोपटे सलग तिसऱ्यांदा विजयी
Updated On:

भोर: भोर विधानसभा मतदार संघातूत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. २०१४ मध्ये बारामतीकरांना कात्रजचा घाट दाखवून, शिवसेनेला धोपीपछाड देत, तर भाजपला रोखणारे संग्राम थोपटे या वेळी देखील पुन्हा विजयी झाले आहेत.
गेली चार दशके थोपटे पिता-पुत्रांची सत्ता भोर येथे असल्यामुळे ‘भोर म्हणजे थोपटे व थोपटे म्हणजे भोर’ हे समिकरण झाले आहे. गेल्या वेळी युतीच्या लाटेतही चुरशीच्या चौरंगी लढतीत विरोधकांना चारी मुंड्या चितपट करून थोपटे यांनी जिल्ह्यात काँग्रेसचा गड राखला होता. यावेळी देखील थोपटेंनी कुलदीप कोंडेचा पराभवकरत विजयी मुसंडी मारली आहे.





