Peth News : मरळनाथपूर येथे जनावरांच्या शेडला भीषण आग; ५ हजार गवताच्या पेंढ्या जळून खाक, ७ ते ८ जनावरांना वाचवण्यात यश
Peth News : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे बुधवारी सायंकाळी बाजीराव यशवंत मोरे यांच्या जनावरांच्या शेडला आग लागल्याने पाच हजार पेंढ्या गवत व कडबा पेंढ्या जळून खाक झाले सुदैवाने सात ते आठ जनावरांची या आगीपासून सुटका करण्यात आली.

Peth News : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे बुधवारी सायंकाळी बाजीराव यशवंत मोरे यांच्या जनावरांच्या शेडला आग लागल्याने पाच हजार पेंढ्या गवत व कडबा पेंढ्या जळून खाक झाले सुदैवाने सात ते आठ जनावरांची या आगीपासून सुटका करण्यात आली. (Peth News)
याबाबत माहिती अशी की, मरळनाथपूर येथील माळवाडी येथील बाजीराव मोरे व सजन मोरे यांच्या आर सी सी घराला लागून असलेल्या जनावरांच्या शेडमधील गवताच्या गंजीस शॉर्ट सर्किटमुळे सायंकाळी साडेसात वाजता आग लागली. (Peth News)
यावेळी शेडमधील गवताच्या गंजीमुळे आग अधिकच भडकली. यावेळी गावातील युवकांनी प्रसंगावधान राखून या शेडमधील म्हशी व गायींना बाहेर काढून आगीपासून सुटका केली. (Peth News)
ईश्वरपूर नगरपालिका व शिराळा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीच्या सहाय्याने ही आग तासाभरात आटोक्यात आली. या आगीमध्ये अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी ग्रामस्थानी आग विझविण्यासाठी गर्दी केली होती. (Peth News)






