Sangli News : सांगलीतील वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित दाम्पत्याने केले विषारी औषध प्राशन
सांगली येथील वेदांत बंडगर खून प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेल्या सागर माणिक चौगुले (वय २८) व निकिता सागर चौगुले (वय २०, रा. अग्रणधुळगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) या दाम्पत्याने विषारी द्रव्याचे सेवन केल्याची घटना समोर आली आहे.

Sangli News : सांगली येथील वेदांत बंडगर खून प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात (Sangli News) आलेल्या सागर माणिक चौगुले (वय २८) व निकिता सागर चौगुले (वय २०, रा. अग्रणधुळगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) या दाम्पत्याने विषारी द्रव्याचे सेवन केल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेनंतर दोघांनाही तातडीने कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून, दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सांगलीतील वेदांत बंडगर या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाने (Sangli News) जिल्ह्यात मोठी खळबळ उडविली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित निलेश गडदे याच्यासह आणखी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे समजते.
अशातच अग्रणधुळगाव येथील सागर चौगुले व निकिता चौगुले या दाम्पत्याने विषारी द्रव्याचे सेवन केल्याची घटना समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाशी आपला कोणताही (Sangli News) संबंध नसताना आपले नाव जोडले जात असल्याची खंत सागर चौगुले व्यक्त करीत होता. या पार्श्वभूमीवर मानसिक तणावातून दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.






