Sangli News : सांगली जिल्ह्यात उद्यापासून रंगणार राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा; पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
ईश्वरपूर येथील सर्जेराव यादव प्रतिष्ठान आणि रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून (दि. १३) रेठरे धरण (Sangli News) येथे रंगणार आहे.

Sangli News : ईश्वरपूर येथील सर्जेराव यादव प्रतिष्ठान आणि रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून (दि. १३) रेठरे धरण (Sangli News) येथे रंगणार आहे.
या स्पर्धेमुळे सांगली जिल्ह्यातील (Sangli News) बॉक्सिंग खेळाला नवी दिशा मिळण्याबरोबरच स्थानिक खेळाडूंना राज्यस्तरीय खेळाडूंचा खेळ अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत १९ वर्षांखालील युवा महिला आणि वरिष्ठ पुरुष गटातील बॉक्सर सहभागी होणार आहेत. सांगली जिल्ह्यात प्रथमच वरिष्ठ गटातील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्या सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बॉक्सिंगसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल.
प्रशिक्षक, क्रीडा संघटना, शाळा, महाविद्यालये आणि पालकांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास सांगली जिल्ह्यातून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सर घडू शकतील, असा विश्वास सांगली (Sangli News) जिल्हा बॉक्सिंग समन्वयक सर्जेराव यादव यांनी व्यक्त केला. क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






