Sangli News : मिरज शहर पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांवर ‘मकोका’
Sangli News : गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी सांगली पोलिसांनी एक मोठी आणि कडक पावले उचलली आहेत.

Sangli News : मिरज शहर परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘पिट्या भोरे’ टोळीवर मिरज शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (Sangli News)
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली, मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या पथकाने केली. या कारवाईत गजानन बिराजदार, सचिन ऐवळे आणि अनिता पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (Sangli News)
पोलिसांनी पृथ्वीराज उर्फ पिट्या राहुल भोरे (वय 20), ध्रुव राहुल भोरे (वय 23), प्रथमेश स्वरूप तांदळे (वय 29) आणि प्रवीण विनोद मोरे (वय 20) या चौघांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. (Sangli News)
पोलिसांच्या माहितीनुसार, हे चौघेही मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. संबंधित प्रकरणात आरोपींनी एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले होते. (Sangli News)
आरोपींच्या गुन्हेगारी इतिहासाची सखोल पडताळणी केल्यानंतर त्यांची कृत्ये संघटित गुन्हेगारीच्या व्याख्येत बसत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मिरज शहर पोलिसांनी याबाबतचा प्रस्ताव सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता. (Sangli News)
पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 111 अंतर्गत वाढीव कलमे लावत मकोका अंतर्गत कारवाई करण्यास परवानगी देण्यात आली. या कारवाईमुळे मिरज परिसरातील संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. (Sangli News)





