काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांचे अखिलेश-ममतांना प्रत्युत्तर ; म्हणाले, त्यांच्या बोलण्याने…”

Sandeep Dixit on SP-TMC । पुढील महिन्यात म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत राजकीय वर्तुळात बरीच राजकीय शाब्दिक हल्ले सुरू आहेत. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, इंडिया ब्लॉकबद्दल विविध गोष्टी बोलल्या जात आहेत. त्यातच तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने दिल्ली निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या समर्थनार्थ एक निवेदन दिले. इंडिया ब्लॉकमधील विभाजनाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजप नेत्यांकडून विधाने समोर आली आहेत.
काँग्रेसचे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी यासंदर्भात एक भाष्य केले आहे. त्यांनी, “इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी स्थापन करण्यात आला होता, त्याचा विधानसभेशी काहीही संबंध नाही. जर उद्या मी ऑस्ट्रेलियाला पाठिंबा देत असल्याचे म्हटले तर तिथे जेवढा प्रभाव माझा पडेल तेवढा प्रभाव दिल्लीत सपा किंवा तृणमूल काँग्रेसचा पडेल” असे म्हणत त्यांनी पलटवार केला आहे. ते पुढे म्हणाले की, “त्यांना (सपा/तृणमूल काँग्रेस) असे वाटत असेल की त्यांच्या घोषणेने दिल्ली हादरली आहे, तर मी त्यांना असे म्हणेन कि मोठे नेतेही हवेत किल्ले बांधू शकतात.”
तसेच काँग्रेस नेते तारिक अन्वर म्हणाले, “प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे, दिल्ली निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. निर्णय घेण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या स्वतःच्या अटी असतात. राजकीय काही गोष्टींबाबत देशाच्या वातावरणाचाही विचार करावा लागेल.”
केजरीवाल एक संदेश देऊ इच्छितात…’ Sandeep Dixit on SP-TMC ।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, “केजरीवाल निवडणुकीच्या मैदानात स्वतःचे समीकरण बनवतात. ते दिल्लीतील लोकांना संदेश देऊ इच्छितात की भाजप आणि काँग्रेस एकत्र आहेत पण लोकांना माहिती आहे की भाजप काँग्रेस एकत्र येऊ शकत नाही.”
‘दिल्लीचे लोक हुशार आहेत… Sandeep Dixit on SP-TMC ।
भाजप नेते प्रवीण खंडेलवाल म्हणाले,”चोर-चोर मौसेरे भाई…असे म्हणत बंगाल आणि उत्तर प्रदेशात तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्ष जे काही करत आहेत, तेच केजरीवाल दिल्लीत करत आहेत. प्रश्न असा आहे की दिल्लीचे लोक हे समर्थन स्वीकारतील का.” असे म्हणत त्यांनी टीका केली.





