ऐका आणि स्वस्थ बसा… संदीप देशपांडेंनी पोस्ट केलेला राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ चर्चेत

मुंबई – राम नवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली. यावेळी हल्लेखोरांनी काही वाहनांना देखील आग लावली होती. यानंतर पोलीस प्रशासनाने योग्य ती करवाई करत गुन्हे देखील नोंदवल्याचे समोर आले. तर मुंबईतील शोभा यात्रेमध्ये देखील काही गटांमध्ये राडा झाल्याचे समोर आले होते. यानंतर राज्यातील राजकारण देखील तापू लागले आहे. विरोधकांनी थेट सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे.अशात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे.
राज ठाकरेंच्या एका जुन्या सभेतील हा व्हिडीओ असल्याचे समजते. यावेळी राज ठाकरे दंगलीबाबत सूतोवाच करताना दिसून येत आहेत. मात्र राज ठाकरे यावेळी ज्या विषयावर बोललेत ते मुद्दे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. ऐका आणि स्वस्थ बसा ‘या’ कॅप्शनखाली देशपांडे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
काय म्हणालेत नेमकं राज ठाकरे या व्हिडिओमध्ये
राज ठाकरे त्यावेळी भरसभेत म्हणाले होते,मदरश्यावर धाडी टाका काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल. पाकिस्तनाची आपल्याला गरजच नाही कारण उद्या जर काही घडलं तर आतमधील ही परिस्थिती आवारता आवारता आपल्या नाके नऊ येईल. पोलिसांना विचारा त्यांना सर्व माहिती आहे. असं ठाकरेंनी या सभेत ठणकावून सांगितलं होत.
ऐका आणि स्वस्थ बसा pic.twitter.com/Jn4yliHY26
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 31, 2023
विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरेंच्या भाषणादरम्यान या व्हिडिओमध्ये मनसेने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीचा भाग देखील जोडला आहे.यामुळे राज ठाकरेंनी त्यावेळी दिलेला इशारा नुकत्याच झालेल्या काही राड्यांबाबत होता अशी चर्चा आता सुरु झाली आहे.





