Koregaon Bhima News : सणसवाडीत गावठी पिस्तूलासह तरुणाला अटक; 2 जिवंत काडतुसे व कारसह 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त
Koregaon Bhima News : सणसवाडी येथील अंबिका कला केंद्रासमोर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने सापळा रचून अटक केली.

Koregaon Bhima News : शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सणसवाडी येथे गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. धनंजय आकाश धुणगव (वय ३२, रा. आदर्शनगर, दत्त कॉलनी, दिघी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. (Koregaon Bhima News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना गोपनीय बातमीदारामार्फत धुणगव हा अंबिका कला केंद्रासमोर, नगर-पुणे महामार्गावर, सणसवाडी येथे गावठी पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली. (Koregaon Bhima News)
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे तसेच लाल रंगाची स्विफ्ट कार, असा एकूण ४ लाख ५० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Koregaon Bhima News)
याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (Koregaon Bhima News)
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलीस फौजदार संजय पड्याळ, पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील तसेच पोलीस अंमलदार सागर धुमाळ यांनी सहभाग घेतला. (Koregaon Bhima News)





