Manoj Jarange : देवाला साकडे घालून सरकार सुधारणार नाही; जनताच वठणीवर आणेल; मनोज जरांगेचा घणाघात
Manoj Jarange : "देवाला साकडे घालून हे सरकार सुधारणार नाही. मराठा, धनगर आणि दिन-दलित एकत्र येऊनच या सरकारला वठणीवर आणतील.

Manoj Jarange : देवाला साकडे घालून सरकार सुधारणार नाही. मराठा, धनगर, दिन दलितच सरकारला वठणीवर आणतील. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठ्यांचा नाद करू नये. मराठ्यांपुढे सत्तेचे शहाणपण चालणार नाही, सरकारने लक्षात घेतले पाहिजे, अशी घणाघाती टीका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी केली. (Manoj Jarange)
पंढरपूर तालुक्यातील सरकोलीमधील सभेमधून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला. पंढरपूर दौऱ्यावर असताना एकादशीनिमित्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल विठुमाऊली चरणी नतमस्तक झाले. सरकोलीमध्ये रविवारी मराठ्यांचा जनसागर लोटला होता. (Manoj Jarange)
मनोज जरांगे म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठ्यांचा नाद करू नये. मराठे मागे लागले तर पळता भोई करून सोडतील. वेळीच सुधरा आणि चूक सुधारा अन्यथा गय करणार नाही. ज्याची चूक त्याच्यावरच आरोप हाच आपला कार्यक्रम आहे. (Manoj Jarange)
एकनाथ शिंदे, उदय सामंत यांनी चूक सुधारली पाहिजे, नाहीतर त्यांच्या पाठीमागील मराठ्याचा वर्ग फुटेल. प्रसाद लाड, उदय सामंत आणि शंभूराजे देसाई मरमर करतात. पण आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल, असेही ते म्हणाले. (Manoj Jarange)
सत्तेपुढे शहाणपण नव्हे तर जनतेपुढे शहाणपण चालत नसते. जनतेपुढची शहाणपण जेव्हा लक्षात येईल तेव्हा विमानात बसून दुसऱ्या राज्यात देशात जावं लागते. शेख हसीना अक्का आपल्या देशात कशी आली होती. तशी अवस्था सरकारची होईल, असा इशारा त्यांनी दिला. (Manoj Jarange)
Manoj Jarange : “माझा उपोषण करून फेस पाडला आहे…” – मनोज जरांगे






