Samruddhi Mahamarg : समुद्धी महामार्ग 5 दिवसांसाठी राहणार बंद ! अशी असेल वाहतूक व्यवस्था, वाचा…..

Samruddhi Mahamarg – देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg ) उद्घाटनापासूनच सततच्या अपघातामुळे चर्चेत राहिला आहे. आता पुढील 5 दिवसांसाठी महामार्ग दोन टप्प्यात बंद राहणार आहे.
या कालावधीत छत्रपती संभाजीनगर ते जालना असे पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्च दाबवाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. यासाठी पाच दिवस तीन तासांसाठी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे.
हे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 10 ते 12 आणि दुसरा टप्पा 25 व 26 ऑक्टोबर अशा दोन दिवशी असणार आहे. या दिवशी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान
दोन्ही बाजूंची वाहतूक 10 ते 12 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 3.30 वाजेपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात 25 ते 26 ऑक्टोबरला दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत बंद असणार आहे. तसेच इतर कालावधीत या भागातील समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असेल, असे नमूद करण्यात आले आहे.





