Kyle Jamieson Reprimanded : काइल जेमिसनला वैभव सूर्यवंशीशी पंगा घेणं पडलं महागात; बीसीसीआयने केली मोठी कारवाई!
Kyle Jamieson Reprimanded : काइल जेमिसनने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयपीएल प्रशासनाने त्याला सक्त ताकीद दिली असून एक डिमेरिट पॉईंट दिला आहे.

Kyle Jamieson Reprimanded for Aggressive Send-off to Vaibhav Sooryavanshi : आयपीएल २०२६ च्या ४३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दिल्लीने राजस्थानवर ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर दिल्लीचा गोलंदाज काइल जेमिसन एका वेगळ्याच कारणामुळे वादात सापडला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयपीएल प्रशासनाने त्याला सक्त ताकीद दिली असून एक डिमेरिट पॉईंट दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या सुरुवातीला काइल जेमिसनने भेदक गोलंदाजी करत १५ वर्षीय युवा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीला बाद केले होते. वैभवने डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला होता, मात्र दुसऱ्याच चेंडूवर जेमिसनच्या अचूक यॉर्करवर तो क्लीन बोल्ड झाला. यानंतर जेमिसनने अत्यंत आक्रमकपणे वैभवच्या जवळ जात आक्रमक जल्लोष केला आणि त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर बीसीसीआयने काइल जेमिसनवर कारवाई केली आहे.
An in-swinging yorker 😲🔥
🎥 Kyle Jamieson gets Vaibhav Sooryavanshi early 👊
Wait for the celebration 👀
Updates ▶️ https://t.co/6OOjzHtZiD#TATAIPL | #KhelBindaas | #RRvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/6vxJ5ahlb3
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2026
शिक्षा आणि आचारसंहिता –
🚨 Kyle Jamieson has been warned and handed one demerit point for his aggressive celebration after dismissing Vaibhav Sooryavanshi
Jamieson was in breach of Article 2.5 of the IPL’s Code of Conduct #IPL2026 #RRvsDC pic.twitter.com/GB9bRvwUSy
— Cricbuzz (@cricbuzz) May 2, 2026
सामन्यानंतर जेमिसनची ही कृती आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल १ अंतर्गत कलम २.५ च्या विरुद्ध असल्याचे निष्पन्न झाले. या नियमानुसार, अशी कोणतीही कृती किंवा हावभाव ज्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडू भडकू शकतो, त्यावर बंदी असते. जेमिसनने आपला गुन्हा लगेचच मान्य केला आणि सामनाधिकारी राजीव सेठ यांनी सुनावलेली शिक्षा बिनशर्त स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता कोणतीही पुढील सुनावणी होणार नाही.
वैभव सूर्यवंशीला बाद करुन चांगली सुरुवात केल्यानंतरही जेमिसन या सामन्यात महागडा ठरला. त्याने आपल्या ४ षटकांत ४८ धावा देऊन केवळ १ विकेट्स घेतली. काइल जेमिसनच्या युवा खेळाडूंसोबतच्या या वर्तनावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यानंतर आता बीसीसीआयने कडक भूमिका घेतल्याने क्रिकेटप्रेमी समाधानी आहेत.





