संभाजीराजेंची सरकारला चेतावणी; म्हणाले, “तुमच्या हातात जे आहे ते…”

कोल्हापूर/प्रतिनिधी – 2014 नंतर ESBC आरक्षण आणि त्यानंतर SEBC आरक्षणांतर्गत अनेकांना नियुक्तीच्या अनेकांना ऑर्डर मिळाली पण कामावर घेतलं जातं नाही… अस असताना सरकार काय करताय.. तुमच्या हातात जे आहे ते आधी करा अशी अशी चेतावणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकार ला दिलीय. ते कोल्हापूरात मराठा अरक्षणसाठी आयोजित न्यायिक परिषदेत बोलत होते. दरम्यान , इडब्युएस मधून धोका होणार नाही याची जबाबदारी समर्थन करणाऱ्यांनी घ्यावी अस देखील राजे म्हणालेत.
सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूरात न्यायीक परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या न्यायिक परिषदेत कोल्हापूर सह पाच जिल्ह्यातील वकील सहभागी झाले होते. या परिषदेत विविध मान्यवरांनी मराठा आरक्षणा संदर्भात परखड मतं मांडली.
यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात ठराविक वकिलांवर भर देण्यात येऊ नये, मराठा वकिलांची फौज या लढ्यात असली पाहिजे, वकिलांनी यामध्ये पुढाकार घ्यावा,असे आवाहन करत मराठा समाजाला इडब्युएस मधून आरक्षण नको या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तसच इडब्युएस आरक्षणाचे समर्थन करणारे पुढे काही धोका झाल्यास जबाबदारी घेणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान ,इडब्युएस मधून धोका होणार नाही याची जबाबदारी समर्थन करणाऱ्यांनी घ्यावी अस सांगत अनेकांना नियुक्ती ऑर्डर मिळाली पण कामावर घेतलं जातं नाही… अस असताना सरकार काय करताय.. तुमच्या हातात जे आहे ते आदि करा अशी अशी चेतावणी देत राज्य सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून वर दबाव टाकलाच पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी केलाय.
मराठा आरक्षणासाठी आता आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. मागे काय झालं ते पाहायचं नाही, आता पुढे काय होणार ते पाहिलं पाहिजे. कायदेशीर लढाई लढणाऱ्यांना पाठिंबा कसा देता येईल ते पाहिले पाहिजे. इडब्लूएस स्वीकारून मराठा आरक्षणासाठी 42 जणांनी दिलेले बलिदान व्यर्थ घालावायच का? असा सवाल देखील संभाजीराजेंनी विचारलाय.
सारथी आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, राजर्षी शाहू शिष्यवृत्ती, मराठा समाजासाठी वसतिगृहे याबाबत सरकार काम का करत नाही. वकिलांनी याबाबत सरकारला जाब विचारावा. यासंदर्भात आवाज उठवला पाहिजे. कोल्हापूरकरांनी यासाठी पुढाकार घेऊन न्यायालयात याचिका दाखल करावी, असे आवाहन संभाजीराजेंनी केले.





