Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर हा लाचार माणूस आहे. जो माणूस बिरोबाचा झाला नाही, तो धनगर समाजाचा काय होणार? असा सवाल करत संतोष शिंदे यांनी आमदार गोपीचंद पाडळकरवर जोरदार टीका केली होती. संभाजी ब्रिगेडच्या टिकेला आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. संभाजी ब्रिगेडचा अजेंडा काय हे पाच मिनिटं राज्याला सांगा, समाजात जातीय तेढ निर्माण करणं या पलीकडे संभाजी ब्रिगेडने काय केलं असा सवाल करत गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे. हिंदू मोर्चाच्या निमित्ताने ते सोलापुरात आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. Gopichand Padalkar | संभाजी ब्रिगेडने जातीयवाद आणि समाजात तेढ निर्माण करण्याशिवाय कोणतेही काम केले नाही. ते सोडून त्यांचा अजेंडा काय हे महाराष्ट्रासमोर सांगावे. संभाजी महाराजांच्या नावाने संघटना चालवायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही, अशी जहरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड बिलाबाबत त्यांनी भाष्य केले. हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांना जाळ्यात ओढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी हिंदूंमध्ये जागृती होण्याची गरज आहे. याबाबत कायदा होण्याची गरज आहे. वक्फ बोर्डाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो बंधनकारक जरी असला तरी केंद्र सरकारने याबाबत जी भूमिका घेतली आहे, ती ठाम असल्याचे पडळकर यांनी सांगितलं. सुरज चव्हाण यांच्यावरही केली टीका सुरज चव्हाण यांनी आमदार गोपीचंद पडळकर हे दरोडेखोर असल्याचे म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला सोलापूरातून पडळकरांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीवाले मला दरोडेखोर म्हणतात, मी या विषयावर कधी बोललो नाही. माझ्यावर जेव्हा मंगळसूत्र चोरीचा आरोप लावला. 2009 साली त्यांचा अपक्ष आमदार ज्याला 17 अपक्ष उमेदवारांनी पाठिंबा दिला होता. मला 19 हजार मते पडली आणि तो गडी दोन अडीच हजार मतांनी पडला. Suraj Chavan | स्वर्गीय आर आर पाटील हे त्यावेळेस गृहमंत्री होते, त्यावेळेस ते त्यांचे मानस बंधू होते. एक लग्न होतं आणि त्या लग्नाच्या पत्रिकेत मी प्रमुख पाहुणा होतो. त्या लग्नात भांडणं झाली. त्या वेळेस उपस्थित नव्हतो तरीही माझ्यावर केस झाली, असं म्हणत पडळकरांनी काँग्रसेवर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांना चड्ड्याही घालायला नव्हत्या : पडळकर तर हे सर्व राष्ट्रवादीचच पाप आहे. या बिनडोक लोकांना माहिती नाही मी 22 वर्षाचा असल्यापासून सफारी गाडीतून फिरतोय. त्यावेळी त्यांना चड्ड्याही घालायला नव्हत्या. मी धनगराचा पोरगा आहे असल्या चोऱ्यमाऱ्या करण्याची आमची औलाद नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी जिव्हारी लागणारा पलटवार केला आहे. Gopichand Padalkar |