समंथाचे पुन्हा कमबॅक! अॅक्शन चित्रपटाचे दमदार पोस्टर समोर

Samantha : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने ‘सिटाडेल हनी बनी’ आणि ‘फॅमिली मॅन २’ या लोकप्रिय वेबमालिकेत आपल्या अभिनयाची चूनक दाखविल्यानंतर ती आता एका अॅक्शन चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. “माँ इंती बंगाराम” या चित्रपटात समंथा झळकणार असून, चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमधून अभिनेत्री समंथाच्या पात्राची झलक दाखविण्यात आली आहे.
समंथा रुथ प्रभू हिचे केवळ दक्षिण भारतात चाहते नसून अखंड भारतात तिचे अनेक चाहते आहेत, ते नेहमी तिच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत असतात. समंथा आणि नाग चैतन्य हे एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत लग्न केले. त्यानंतर समंथा मोठ्या पडद्यावर पुन्हा कधी कमबॅक करणार अशा चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री नवीन चित्रपटाची घोषणा झाली असून, ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“माँ इंती बंगाराम” या तेलुगू चित्रपटाच्या पोस्टरमध्ये समंथाचा अनोखा लूक लक्ष वेधून घेत आहे. तिचे पात्र रागावलेले आणि पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. तिच्या चाहत्यांनीही अभिनेत्रीच्या लूकवर प्रतिक्रिया दिल्या असून तिचे कौतुक केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे.
या चित्रपटाचा टीझर ९ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय समंथा तिच्या आगामी “रक्त ब्रह्मांड” नावाच्या वेबसिरीजमध्ये व्यस्त असून, लवकरच सिरीजच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी तिच्या “माँ इंती बंगाराम” या तेलुगू चित्रपटाची मोठी उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.
हेही वाचा : Gemini AI: आता न्यू इयर रिझोल्यूशन फेल होणार नाहीत, जेमिनी बनेल तुमचा पर्सनल कोच





