Samantha : चिकुनगुनियाची लागण असूनही समंथाच जीममध्ये वर्कआऊट; व्हिडिओ केला शेअर, कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ हिची तब्येत बिघडली होती. तिला चिकुनगुनिया या आजाराची लागण झाली होती. याबद्दल तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून समंथाला चिकुनगुनिया या आजाराचा त्रास जाणवत आहे. याविषयी तिने शुक्रवारी संध्याकाळी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करीत आपल्याला चिकुनगुनियाचा त्रास होत असल्याचे सांगितले. या आजारातून ती आता बरी होत असून तिने जीममध्ये वर्कआऊट सुरू केलं आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.
समथांने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. यावेळी तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये चिकुनगुनियातून बरे होण्याआधी सांधे दुखीने खूप त्रास होत होता. तसेच तो काळा फन होता, असे असल्याचे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. या आजारातून ती बरी होत असल्याचे देखील तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. समंथा शेवटी सिटाडेलः हनी बनी या चित्रपटामध्ये एजंटच्या भूमिकेत दिसली होती. ही सीरिज राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केली आहे. ७ नोव्हेंबर २०२४ प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या समंथासह वरुण धवन, के के मेनन, साकिब सलीम आणि सिकंदर खेर यांच्याही भूमिका आहेत.
समंथा होती मायोसिटिस आजाराने ग्रस्त
समंथाला मायोसिटिस या आजाराने ग्रस्त होती. या आजारात हात, खांदे, पाय, पार्श्वभाग, पोट आणि पाठीच्या स्नायूंवर परिणाम होतो. आजार आणखी बळावला असेल तर त्याचा अन्ननलिका, डायफ्राम आणि डोळ्यांच्या स्नायूंवरदेखील परिणाम होऊ शकतो. अशा रुग्णांना बसल्यानंतर उभं राहताना, पायऱ्या चढताना, वस्तू उचलतानाही सहत्रा त्रास होतो. मायोसिटिसमध्ये सर्वसामान्यपणे स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवतात. हलका ताप, पुरळ आणि सांधेदुखी ही सुद्धा सामान्य लक्षणं असू शकतात, असे तज्ञांचे मत आहे.





