सिनेसृष्टीतील कलाकारांच्या लव्ह डेटिंगच्या आणि अफेअरच्या चर्चा सातत्याने होत असतात. अनेक कलाकार आपल्या रिलेशनशिपविषयी उघडपणे बोलत नाहीत. मात्र, कलकारांनी कितीही ठरवले तरी या गोष्टींपासून सावध राहायचे तरी त्यांच्या सोशल मीडियावरचे फोटो आणि व्हिडिओतून लव्ह डेटिंग आणि अफेअरच्या चर्चा होत असते. सध्या दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील समंथा रुथ प्रभूविषयी अशाच प्रकारच्या अफेअरच्या चर्चा केल्या जात आहे. यामुळे समंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. अभिनेता नाग चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाल्याचे बोलले जात आहे. नुकतीच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो फेब्रुवारी महिन्यातील असून समंथा रुमर्ड बॅायफ्रेंन्ड राजसोबत स्पॅाट झाली होती. या दोघांचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर समंथा आणि राज यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. समंथा आणि राज पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने या चर्चांना आता उधाण प्राप्त झाले आहे. व्हायरल झालेला फोटो एका मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असलेल्या ब्रन्चच्या वेळीचा असल्याचे सांगितले जात आहे. यात समांथाने हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तर राज निदिमोरु कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये दोघं एकत्र पोज देताना दिसत आहेत. समंथाचे नाव ज्या व्यक्तीसोबत जोडले जात आहे. ती व्यक्ती एक दिग्दर्शक आहे. दिग्दर्शक राज निदिमोरू असे त्याचे नाव असून त्याने काही वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शक राज निदिमोरु याने डीकेसोबत ‘द फॅमिली मैन’, ‘फर्जी’, ‘सिटाडेल: हनी बनी’ आणि ‘गन्स एंड गुलाब्स’ या सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.