Naga Chaitanya : नागा चैतन्याने घटस्फोट प्रकरणावर मौन सोडलं; “कृपया आम्हाला प्रायव्हसी द्या”: चाहत्यांना केली विनवणी

काही दिवसांपूर्वी दक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य याने अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत विवाह केला. नागा चैतन्य आणि शोभिता धुलपिया हे दोघेही त्यांच्या मॅरेज लाइफचा आनंद घेत आहेत. मात्र, आजही समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटोस्फोटाचा विषय चर्चिला जातो. यावर नागा चैतन्य याने मौन सोडले असून तो निर्णय आमची स्वःताची काही कारण असल्यामुळे घेतला असल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.
ती (समंथा) तिच्या आयुष्यात पुढे जात आहे. आजही आम्ही एकमेकांचा सन्मान करत असल्याचे नागा चैतन्य याने सांगितले. आम्हाला आमाच्या मार्गाने प्रवास करायचा होता. स्वतःची काही कारणं असल्यामुळे आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आजही आम्ही एकमेकांचा सन्मान करतो. आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जात आहोत. मला कळत नाही की, आणखी कोणत्या स्पष्टीकरणाची गरज आहे. याबाबतीत कृपया आम्हाला प्रायव्हसी द्या, अशी विनवणी नागा चैतन्यने समंथा आणि त्याच्या घटस्फोटाच्या विषयाबद्ल चाहत्यांना केली आहे. आमचा घटस्फोट आता चर्चेचा विषय होतोय, असे देखील तो म्हणाला.
जो काही निर्णय घेतला, तो आम्ही दोघांना फार विचार करुन घेतला आहे. माझ्यासाठी हा प्रचंड संवेदनशील विषय आहे. एका विभक्त झालेल्या कुटुंबातील मी आहे. त्यामुळे हा अनुभव काय आहे मला माहिती आहे. कोणतंही नातं तोडण्याआधी मी 1000 वेळा विचार करेल आणि आम्ही घेतलेला निर्णय आमचा खासगी निर्णय होता, असे स्पष्टीकरण नागा चैतन्यने त्याच्या आणि समंथाच्या घटस्फोटावर दिले आहे.
चार वर्षातच नात्यात दुरावा अन् घटस्फोट
अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. ये माया चेसावे या चित्रपटाच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, लग्नाच्या चार वर्षांतच समंथा आणि नाग चैतन्य विभक्त झाले. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथाने सोशल मीडियावर घटस्फोट झाले असल्याचे जाहीर केले. यानंतर त्यांच्या चाहत्यांना या जोडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचा मोठा धक्का बसला.





