समंथा रुथ प्रभू दिसणार अॅक्शन अवतारात; ‘या’ अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन

Samantha Ruth Prabhu | दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे नाव आता आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. दीपिका पदुकोण ‘पठाण’ चित्रपटात तर आलिया भट्ट YRF स्पाय युनिव्हर्सच्या ‘अल्फा’ चित्रपटात धमाकेदार अॅक्शन अवतारात पाहायला मिळाली होती. यानंतर आता संमथा देखील ‘रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम’ या वेब सिरीजमध्ये अॅक्शन अवतार दिसणार आहे.
वेब सिरीजमध्ये आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आदित्यने नुकतेच चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. यातील भूमिकेसाठी आदित्यने तलवार आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम’मध्ये आदित्य रॉय कपूर आणि समंथा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
तर मिर्झापूर फेम अली फजल, वामिका गब्बी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. ही मालिका २०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. ही मालिका ‘तुंबाड’ फेम राही अनिल बर्वे दिग्दर्शित करणार आहे. Samantha Ruth Prabhu |
View this post on Instagram
‘सिटाडेल: हनी बनी’मध्ये अॅक्शन दाखवल्यानंतर आता समंथा नव्या प्रोजेक्टद्वारे पुन्हा एकदा समोर येणार आहे. यात आता समंथा आणि आदित्यची जोडी प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी होणार का? हे पाहावे लागणार आहे. Samantha Ruth Prabhu |
हेही वाचा:





