समंथाला सिने इंडस्ट्रीत 15 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर करत मानले आभार

Samantha Ruth Prabhu | अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला सिने इंडस्ट्रीमध्ये 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. फिल्मी दुनियेत १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘एमसीआर ग्रुप ऑफ कंपनीज’तर्फे समंथाचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तिने सुंदर सोनरी रंगाची साडी परिधान केली होती. ज्यात ती फारच सुंदर दिसत होती. यावेळी ती खूप आनंदी असल्याचे पाहायला मिळाले.
समंथाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ’15 वर्षे, अजून बरेच काही येणे बाकी आहे. धन्यवाद चेन्नई, माझा सन्मान केल्याबद्दल खूप आभारी आहे,’ असे लिहिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत तिचे अभिनंदन केले आहे. Samantha Ruth Prabhu |
View this post on Instagram
समांथाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने 2010 मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. या चित्रपटात तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 2012 मध्ये ‘नीथने एन पोनवसंथम’ या तमिळ चित्रपटासाठी आणि ‘ईगा’ या तेलगू चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शेवटची ती ‘सिटाडेल हनी बनी’मध्ये दिसली होती. Samantha Ruth Prabhu |
हेही वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा उपाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता; अजित पवार ‘या’ नेत्याला देणार संधी





