Rajasthan Congress crisis : गहलोत-पायलट यांच्यात धुसफूस सुरूच; गुजरातच्या निकालानंतर…

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा वाद राखेत लपलेल्या निखाऱ्याप्रमाणे धगधगत असल्याची चर्चा कॉंग्रेस मुख्यालयात रंगली आहे. भारत जोडो यात्रा आणि गुजरातच्या निकालानंतर राजस्थानच्या मुद्यावर तोडगा काढला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
कॉंग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा वाद शमल्यासारखा दिसत असला तरी अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. कॉंग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी अलिकडेच राजस्थानचा दौरा करून दोन्ही नेत्यांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, सध्या दिसत असलेली शांतता तात्पुरती आहे, असे सूत्राचे म्हणणे आहे.
कॉंग्रेस हायकमांडकडून या मुद्यावर अंतिम निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हा वाद शांत होणार नाही, असे पक्षातील नेत्यांना वाटत आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेत सामील आहेत आणि गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक सुरू आहे. यातून वेळ मिळाल्यानंतर राजस्थानच्या मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
महत्वाचा मुद्या असा की, कॉंग्रेस हायकमांडने राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसविले जावू शकते. परंतु, अशोक गहलोत यासाठी तयार होतील काय? आणि त्यांनी बंडखोरी केली तर हायकमांड कोणती भूमिका घेणार? अशी चर्चा आहे. अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. गहलोत पायलट यांना कधीही मुख्यमंत्री होवू देणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.
ऐकावं ते नवलच! टोमॅटोप्रमाणे चक्क झाडाच्या फांदीला लगडले बटाटे, पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
दुसरीकडे, गहलोत पायलट यांना मुख्यमंत्री होवू देणार नाही. अशात, गहलोत यांना राजी करण्याची किमया कॉंग्रेसला साधावी लागणार आहे. दिल्लीत बोलावून त्यांना महत्वाचे पद दिले जावू शकते. मात्र, गहलोत यांना मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेसच्या अध्यक्षाचे पद सोडले होते, हे येथे उल्लेखनीय.





