बलुचिस्तानवर सलमान खानचे विधान; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Salman Khan | बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. मात्र सध्या तो त्याच्या चित्रपटामुळे नाही तर, एका विधानामुळे चर्चेत आला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्याने काही देशांचा उल्लेख केला, मात्र यात त्याने चुकीची माहिती दिल्याने त्याला नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे.
बॉलिवूडचे तिन्ही खान सौदी अरेबियातील रियाद येथे जॉय फोरम २०२५ या कार्यक्रमात सहभागी होते. यावेळी सलमान खानने सांगितलं की, ”तुम्ही एखादा हिंदी सिनेमा बनवला आणि तो सौदी अरेबियात रिलीज केला तर तो सुपरहिट होईल.
जर तुम्ही एखादा तामिळ, तेलुगू किंवा मल्याळी सिनेमा इथे रिलीज केला तर तो १०० कोटींचा व्यवसाय करेल. कारण इतर देशांमधून अनेक लोक इथे राहायला आले आहेत. इथे बलुचिस्तानमधील लोक आहेत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील लोक आहेत. सर्वजण येथे काम करत आहेत,” असे सलमान खानने सांगितले.
Finally @BeingSalmanKhan acknowledged Balochistan is not Part of Pakistan ✌️❤️🙏
Salam Khan said “ People of Balochistan, Afghanistan , Pakistan & everywhere”@BDUTT #Balochistan #Baloch pic.twitter.com/TgdqrZhzr6
— Bilal Baloch (@bbfr74) October 18, 2025
सलमानवर टीका
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सलमानवर टीका करण्यात आली आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच एक भाग असून तो वेगळा देश नाही. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानने बलुचिस्तानला आपल्या हद्दीत समाविष्ट केले, परंतु तेथील अनेक संघटनांनी सातत्याने स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेची मागणी केली आहे. Salman Khan |
मात्र आता सलमानच्या या विधानावरून नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे. यावरून काही युजर्सनी त्याला भूगोल शिकण्याचा सल्ला दिला. तर काहींनी सलमान नकळतपणे हे विधान बोलून गेल्याचे म्हणत त्याला सावरण्यचा प्रयत्न केला. Salman Khan |
हेही वाचा :





