Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’ शोमधून आणखी एक सदस्य ‘या’ कारणामुळे बाहेर
घरातील सर्वच सदस्य भावुक

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’ शोमधून आणखी एक सदस्य घरातून बाहेर पडला आहे. स्पर्धक मनीष गोयलला वैद्यकीय कारणास्तव शोमधून बाहेर पडावे लागले. मनीषच्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला चालण्यातही प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
‘वीकेंड का वार’ मध्ये सलमानने सांगितले की, मतं कमी मिळाली म्हणून मनीष शो सोडत नाही. प्रकृतीच्या कारणास्तव मनीष शोला निरोप देत आहे. जर मनीष ठणठणीत असता तर कमी मतं मिळाल्याने दुसराच एक स्पर्धक घराबाहेर पडणार होता, असाही खुलासा सलमानने केला.
या आठवड्यात मनीषसोबत माही विजचा एलिमेशनमध्ये समावेश होता, पण मनीषने मेडिकल कारणामुळे शो सोडल्याने ती एव्हिक्शनमधून वाचली आहे. दरम्यान, मनीष गोयलने ‘बिग बॉस 20’ च्या घरात वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता.
View this post on Instagram
दरम्यान, याआधी मनीषने स्वतः बिग बॉससोबत बोलणं करत आपल्या अडचणी त्याने सांगितल्या होत्या. याशिवाय डॉक्टरांनीही मनीषला ४ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मनीष बाहेर गेल्यानंतर घरातील सर्वच सदस्य भावुक झाले.





