सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी बंपर कमाई

Sikandar Box Office Collection | बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रिलीज झाला आहे. सलमानचा हा चित्रपट आता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला तगडी टक्कर देण्यास सज्ज झाला आहे. सिकंदर चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. मात्र ‘छावा’चा पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड मोडण्यास ‘सिकंदर’ अपयशी ठरला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली आहे. विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 33.10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना पाहायला मिळत आहे.
चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना वेड लावले आहे. या चित्रपटात यांच्यासोबत काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘बाहुबली’ फेम अभिनेते सत्यराज ‘सिकंदर’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत.’ सिकंदर’ चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. Sikandar Box Office Collection |
दरम्यान, सलमानच्या या चित्रपटाबाबत अनेक चाहते पैसा वसुल आणि परिपूर्ण चित्रपट म्हणत आहेत. दुसरीकडे, भाईजानच्या अभिनयाचे चाहत्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्सची प्रेक्षक प्रशंसा करत आहेत. यातच आता पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर ‘सिकंदर’ आज ईदला किती कोटींची कमाई करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. Sikandar Box Office Collection |
हेही वाचा:
“अनेक वेळा त्यांच्यावर टीका केली, पण…”; राज ठाकरेंच्या भाषणाबाबत अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?





