“अनेक वेळा त्यांच्यावर टीका केली, पण…”; राज ठाकरेंच्या भाषणाबाबत अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

Anjali Damania | मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा 30 मार्च रोजी पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. औरंगजेबाची कबर, संतोष देशमुख हत्याप्रकरण, नदी प्रदूषण, मराठी भाषा यासारख्या विषयांवर त्यांनी परखडपणे आपली भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरेंनी केलेल्या या भाषणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक केले आहे. खरं बोलायला हिम्मत लागते, जी राज ठाकरेंमध्ये नक्कीच असल्याचे दमानिया यांनी म्हंटले आहे.
अंजली दमानिया यांचे ट्वीट
अंजली दमानिया यांनी ट्वीट करत लिहिले की, “राज ठाकरे यांचे भाषण ऐकत होते. अप्रतिम… सगळे मुद्दे अतिशय सुंदर मांडले. तो प्रत्येक मुद्दा मांडण्याची खरंच गरज होती. चांगल्या राज्यकर्त्यांमध्ये जे गुण हवेत, ते ह्या व्यक्तीमध्ये आहेत, ते फक्त कृतीत येत नाहीत. आले, तर त्याचे स्वागत. मी अनेक वेळा त्यांच्यावर टीका केली आहे, पण आजच्या भाषणाची प्रशंसा मी नक्कीच करेन. खरं बोलायला हिम्मत लागते, जी त्यांच्यामध्ये नक्कीच आहे.”
राज ठाकरे यांचे भाषण ऐकत होते.
अप्रतिम !
सगळे मुद्दे अतिशय सुंदर मांडले. तो प्रत्येक मुद्दा मांडण्याची खरंच गरज होती.
चांगल्या राज्यकर्त्यांमध्ये जे गुण हवेत, ते ह्या व्यक्ती मध्ये आहेत, ते फक्त कृतीत येत नाहीत. आले, तर त्याचे स्वागत.
मी अनेक वेळा त्यांच्यावर टीका केली…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 30, 2025
राज ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्दे
- राज ठाकरेंनी मराठी भाषेवरून आक्रमक होत राज ठाकरेंनी मराठी न बोलणाऱ्यांना परप्रांतीयांना दम भरला. आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाही, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे. तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील. मराठी नववर्षांच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ, असा इशारा यावेळी राज ठाकरे यांनी दिला. Anjali Damania |
- मराठी माणसाच्या एकतेसाठी त्यांनी आवाहन केले. त्यांच्या मते, आज महाराष्ट्रात जाती-जातीत विभागणी झाली असून, मराठी माणूस आपली एकजूट विसरला आहे. या संदर्भात त्यांनी मराठी अस्मितेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.
- औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिसली पाहिजे. तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथं गाडला. हा आमचा इतिहास आहे. आम्ही कुणाला गाडलं हे जगाला कळू द्या, तिकडे लहान लहान मुलांच्या ट्रीप गेल्या पाहिजे, असे देखील राज ठाकरे म्हणाले. Anjali Damania |
- बीडमधील सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली. किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. नसानसांमध्ये एवढी क्रुरता भरली असेल ना तर मी दाखवीन जागा तेथे जा. बीडमध्ये विषय होता फक्त पैशांचा, वाल्मिक कराड आणि ज्या आरोपींची नावं येतायत, हे सर्व खंडणीसठी. संतोष देशमुखांनी त्याला विरोध केला. त्याठिकाणी कोणीही असतं तरी त्याचं देशमुखांप्रमाणेच केलं असतं. विषय होता पैशांचा, खंडणीचा आणि खंडणीला विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबल काय लावलं, वंजारींनी मराठ्याला मारलं, मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. यावेळी राज ठाकरेंनी जातीच्या विषयावर रोखठोक भूमिका मांडली.
हेही वाचा :
रमजान ईदचा उत्साह; पुण्यात हजारो मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण





