सलमान खान अन् झीशान सिद्दीकीला पुन्हा जीवे मारण्याची धमकी ; यावेळी केली ‘ही’ मागणी

Salman Khan-Zeeshan Siddique Death Threat । अभिनेता सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकीला पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. वांद्रे पूर्व येथील झीशान सिद्दीकी यांच्या जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आल्याचे संगणयत येत आहे. शुक्रवारी सायंकाळी धमकीचा फोन आला. फोनवर या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि आमदार झीशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देत पैशांची देखील मागणी केली आहे. दरम्यान ,उत्तर प्रदेशातून कॉल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी कार्यालयातील कर्मचाऱ्या झीशान सिद्दीकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, निर्मल नगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी केली असता कॉल करणारी व्यक्ती नोएडातील असल्याचे निष्पन्न झाले. मुंबई पोलिसांनी त्याला नोएडा येथून अटक केली. त्याचे वय 20 वर्षे आहे. गुरफान खान असे आरोपीचे नाव आहे. धमकी देणाऱ्या तरुणाने थेट पैशांची मागणी केली नसून, या बहाण्याने काही पैसे मिळवण्याचा त्याचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर पोलीस सतर्क Salman Khan-Zeeshan Siddique Death Threat ।
काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांची जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तेव्हा ही धमकी देण्यात आली आहे. सलमान खानशी असलेल्या जवळीकीमुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीने ही हत्या घडवून आणल्याची चर्चाही सुरू झाली. मात्र, पोलीस विविध पैलूंचा तपास करत आहेत. याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
सलमान खानच्या अपार्टमेंटबाहेर गोळीबार Salman Khan-Zeeshan Siddique Death Threat ।
सलमान खानला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. सलमान खानच्या अपार्टमेंटबाहेरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, या संदर्भात मुंबई पोलिसांनी काही लोकांना अटक केली होती. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्याचवेळी बीबीसीशी नुकत्याच झालेल्या संवादात झीशान सिद्दिकी म्हणाले होते की, त्यांचे वडील गरिबांच्या हक्कासाठी आवाज उठवत होते आणि हा आवाज दाबण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली होती.
हेही वाचा
‘दिवाळीच्या वस्तू फक्त हिंदूंकडूनच घ्या’ ; भोपाळमध्ये बजरंग दलाच्या पोस्टरवरून राडा





