Nitesh Rane : “उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू निघाला…”; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंना जोरदार टोला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू निघाला.

Nitesh Rane – मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या शताब्दी वर्षानिमित्त दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेत त्यांनी भाषिक वादाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी खडेबोल सुनावले आहेत.
राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे सरकारी भीतीमुळे मोहन भागवत यांच्या रटाळ कार्यक्रमाला लोक आले. अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मंत्री नितेश राणे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच उद्धव ठाकरेंना देखील डिवचलं आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी, मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती, नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या, असे राज यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
नितेश राणे म्हणाले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू निघाला. राहुल गांधींसमोर उद्धव ठाकरे आपल्या वडीलांना हिंदूहृदयसम्राट देखील बोलू शकत नाहीत, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
रटाळ प्रवचनात उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली असती. योग्य दिशा राज ठाकरेंना मिळाली असती आले असते तर रटाळ बोलण्यापेक्षा बैद्धिक घेतलं असतं तर इतकी लोकं सोडून गेले नसते, अशी टीका नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर केली.
हे देखील वाचा :
Silver Price Today: चांदी एकाच झटक्यात १०,००० रुपयांनी स्वस्त ; आजचा १ किलोचा भाव किती? जाणून घ्या






