Ajay Devgn : सैयाराची क्रेझ कायम! महावतार नरसिम्हाचाही बोलबाला…; सन अॅाफ सरदार 2 अन् धडक 2 फटका बसणार ?

Ajay Devgn : १ अॅागस्ट म्हणजे आज बॅालिवूडमधीन दोन मोठे चित्रपट रिलीज झाले आहेत. एक आहे अजय देवगण याचा सन अॅाफ सरदार २ आणि दुसरा आहे अभिनेता सिद्धांत चुतर्वेदी आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांचा धडक २. हे दोन्ही चित्रपट सिक्वल आहेत.
पण गेल्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या सैयारा चित्रपटाचा बोलबाला अजूनही बॅाक्स अॅाफिसवर कायम आहे, अशातच महावतार नरसिम्हा या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. यामुळे सन अॅाफ सरदार २ आणि धडक २ या चित्रपटांना याचा मोठा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे.
या दोन्ही चित्रपटांचे अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर आले आहेत. 1 ऑगस्टसाठी सिनेपोलिसमध्ये अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे खालीलप्रमाणे आहेत. महावतार नरसिम्हा: 4500 सन ऑफ सरदार 2: 4000 धडक 2: 3000 सैयारा: 1800 या आकड्यांवरून तरी महावतार नरसिम्हा या चित्रपटाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत.
खरंतर सन अॅाफ सरदार आणि धडक या चित्रपटांना चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता. त्यामुळे आता सिक्वल कितपत कमाई करतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवतात का? हे पाहावं लागणार आहे.
सन ऑफ सरदार २ मध्ये अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत, तर रवि किशन, मुकुल देव आणि संजय मिश्रा यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. धडक २ मध्ये तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.





