‘रेस 4’ या ॲक्शन चित्रपटासाठी ‘सैफ अली खान’चे नाव फायनल

Bollywood । ‘रेस’ फ्रेंचायझी हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय ॲक्शन-थ्रिलर चित्रपटांपैकी एक आहे. ‘रेस’ आणि ‘रेस 2’मध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला पसंती मिळाली होती. मात्र, या चित्रपटाच्या शेवटच्या सीक्वल म्हणजेच ‘रेस ३’मध्ये काही खास नव्हते. या चित्रपटात सैफच्या जागी सलमान खानची एंट्री झाली. आता ‘रेस 4’ बाबतही बातम्या येत आहेत. रिपोर्टनुसार, सैफ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या चौथ्या सिक्वेलमध्ये सैफला परत करण्याचा विचार निर्माते करत आहे.
सैफ हा ‘रेस’ फ्रँचायझीचा प्राण मानला जातो. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागात त्याच्या अभिनयाला रसिकांनी भरभरून दाद दिली. दरम्यान, सैफच्या ‘रेस 4’मध्ये पुन्हा प्रवेश झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. वृत्तानुसार, सैफ काही दिवसांपासून निर्माता रमेश तौरानीसोबत ‘रेस 4’ बद्दल चर्चा करत आहे आणि दोघेही या निष्कर्षावर पोहोचले आहेत की चौथ्या भागावर काम सुरू करावे लागेल. दोघेही यासाठी पूर्णपणे तयार आहेत.
ही फिल्म फ्रँचायझी त्याच्या सीन्स, गाणी, स्टाइल, ॲक्शन, ट्विस्ट आणि टर्नसाठी ओळखली जाते. ‘रेस 4’च्या कथेवर काम पूर्ण झाले असल्याचेही कळत आहे. सैफ अली खान व्यतिरिक्त आणखी एक मोठा कलाकार यात सहभागी होणार असून त्याची कास्टिंगही सुरू असल्याचे बोलले जात आहे.’रेस’चा पहिला भाग अब्बास-मुस्तांकी या जोडीने दिग्दर्शित केला होता. पण नंतर दुसऱ्या भागात ही जबाबदारी रेमो डिसूझाने घेतली. मात्र, चौथ्या भागाचे दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप ठरलेले नाही.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, सैफ अली खान शेवटचा प्रभासच्या 2023 मध्ये रिलीज झालेल्या ‘आदिपुरुष’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाला अनेक वादांनाही सामोरे जावे लागले होते. तो आता ‘देवरा’ या साऊथ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.





