Saif Ali Khan attack : होय मीच हल्ला केला.! आरोपीची पोलिसांसमोर कबुली, बांगलादेशातून भारतात का आला होता? पाहा…

Saif Ali Khan attack – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झाला. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. पण सैफच्या घरी हा हल्लेखोर इतक्या सहज पणे कसा घुसला? तेवढ्याच सहजतेने हल्लाकरून तो तिथून कसा बाहेर पडला? या सारखे अनेक प्रश्न मुंबई पोलिसांसह सर्वांनाच पडले होते. अखेर मुंबई पोलिसांनी ठाण्यातून हल्लेखोराला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
सैफ अली खानच्या घरी काही महिन्यांपूर्वी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी सैफ अली खानने एक खासगी हाउसकीपिंग एजन्सी नेमली होती. याच एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शहजादने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता. त्यावेळेस त्याने सैफच्या घराची पाहणी केली होती. ही बाब त्याच्या चौकशीतून समोर आली आहे.
तो सैफच्या घरी गेल्यानंतर त्याने संपूर्ण घराची रेकी केली होती. शिवाय त्याच वेळी सैफच्या घरी चोरी करण्याचा प्लॅन त्याने आखला होता. त्यासाठी त्याने सैफच्या घराचा कोपरा अन् कोपरा पाहून घेतला होता. घरात कसे घुसायचे, कुठून घुसायचे हे त्याने याच वेळी पाहून घेतले होते, असे पोलिस चौकशीत समोर आले आहे.
आरोपीने काही दिवसांपूर्वी वांद्रे इथल्या एका हॉटेलमध्ये काम करू लागला होता. शिफ्ट संपल्यानंतर तो या परिसरात पायी चालायचा. अशातच एकेदिवशी तो सैफच्या घराजवळ पोहोचला होता. सैफच्या इमारतीच्या मागच्या बाजूला कोणताच सुरक्षारक्षक किंवा सीसीटीव्ही नसल्याचं त्याच्या निदर्शनास आलं.
तो पार्किंग एरियाच्या रस्त्याने फायर एग्झिटजवळ पोहोचला आणि तिथून तो जिने चढून अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचला. तिथे गेल्यानंतर तो डक्ट एरियाद्वारे थेट सैफ अली खानच्या मुलाच्या खोलीतील बाथरुममध्ये शिरला. असं देखील त्याने सांगितलं आहे.
आरोपीने पोलिसांना काय काय सांगितलं?
– तो बांगलादेशमध्ये कुस्तीपटू होता
– कमी वजनीगटात तो कुस्ती खेळायचा
– राष्ट्रीय स्तरावर तो कुस्ती खेळायचा
– कुस्तीमुळेच सैफवर ताबा मिळवण्यात यश मिळालं
– बेरोजगारीमुळे भारतात आला होता
“होय मीच हल्ला केला…”; आरोपीने दिली कबुली
आरोपीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आणि म्हणाला, “होय मीच हल्ला केला.” – आरोपीने स्पष्ट केलं की तो चोरीच्याच उद्देशाने सैफच्या घरात गेला होता. पण जेव्हा घरात गोंधळ निर्माण झाला, तेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने सैफवर हल्ला केला. आरोपी खरं बोलतोय की खोटं हे सिद्ध करण्यासाठी पोलीस त्याला क्राइम सीनवर घेऊन जाऊन सीन रिक्रिएट करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.





