प्रिया बापटनंतर सई ताम्हणकरचा लेस्बियन सीन चर्चेत; ‘क्राईम बिट’चा ट्रेलर पाहून उडवेल तुमची झोप…

मुंबई – अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ आपल्या दिलखेच अदा, स्टाईल आणि हॉट अंदाजामुळे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं. विविध भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतंच सईनं तिच्या इन्टाग्राम अकांऊंटवरून तिच्या आगामी ‘क्राईम बीट’ या वेबसिरिजचा टीझर प्रदर्शित केला आहे. सध्या तिच्या या वेबसिरिजचा टिझर चांगलाच चर्चेत आला असून, यामध्ये अभिनेत्रीने जबरदस्त असे बोल्ड सीन दिल्याच दिसून आलं आहे. यावेळी एका सीनमध्ये सईच्या लेस्बियन लिपलॉकची झलक दिसली आहे. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं. चाहत्यांकडून देखील या टीझरला चांगलेच लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत.
दरम्यान, ही सिरिज कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचार आणि राजकीय नेत्यांचा त्यातील संबंध यावर आधारित असल्याचे कळते आहे. तसेच, यामध्ये साकीब सलीम, राहूल भट्ट, आदिनाथ कोठारे, सबा आझाद, सई ताम्हणकर, किशोर कदम यांच्या तगड्या भुमिका दिसत आहेत. या टीझरमध्ये बोल्ड आणि ब्युटीफूल अवतारात अभिनेत्री दिसते आहेत. स्विमिंग पूलमध्ये सईचा हॉट लेस्बियन सीनची झलक पाहायला मिळते आहे. ही सिरिज zee5 या अॅपवर प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, यापूर्वी मराठमोळी अभिनेत्री ‘प्रिया बापट’ हिने ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या सिरीजमध्ये लेस्बियन लिपलॉक केल्याचं दिसून आलं होत. तिचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं होतं. मात्र, आता प्रिया नंतर सईच्या लेस्बियन सीनची चर्चा रंगली आहे. विशेष बाब म्हणजे, प्रिया बापटनंही सईच्या या आगामी वेबसिरिजचं कौतुक केलं आहे. यावेळी तिनं कमेंटमध्ये ‘ब्रिंग इट ऑन’. असं प्रतिक्रिया दिल्याचं दिसून आलं.





