GT vs MI : साई सुदर्शनने गिलला मागे टाकत रचला इतिहास! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

GT vs MI Sai Sudarshan create history in IPL : आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या एमआयने जीटीला विजयासाठी २२९ धावांचे लक्ष्य दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शन एकट्याने झुंज दिली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. गुजरातचा संघ निर्धारित षटकात २०८ धावाच करू शकला. परंतु साई सुदर्शन निश्चितच इतिहास रचण्यात यशस्वी झाला.
साईने ४९ चेंडूचा सामना करताना १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८० धावांची खेळी साकारली. ज्यामुळे साई सुदर्शन आता आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात ७०० पेक्षा जास्त धावा करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत त्याच्याच संघाचा कर्णधार शुबमन गिलचा विक्रम मोडला आहे. गिलने २०२३ मध्ये २३ वर्षे २५७ दिवसांच्या वयात ८९० धावा केल्या, तर साई सुदर्शनने आता २३ वर्षे २२७ दिवसांच्या वयात ७५९ धावा करून हंगामाचा शेवट केला.
𝐀 𝐬𝐞𝐚𝐬𝐨𝐧 𝐭𝐨 𝐫𝐞𝐦𝐞𝐦𝐛𝐞𝐫 𝐟𝐨𝐫 𝐒𝐚𝐢 𝐒𝐮𝐝𝐡𝐚𝐫𝐬𝐚𝐧! 👏🏼
The southpaw ends IPL 2025 with 759 runs at a blazing strike rate of 156+
You gotta feel for him! 🥹#IPL2025 #GTvMI #SaiSudharsan pic.twitter.com/IMril3fAIo
— Sportskeeda (@Sportskeeda) May 30, 2025
आयपीएलच्या एका हंगामात ७०० पेक्षा जास्त धावा करणारे सर्वात तरुण फलंदाज:
साई सुदर्शन – २३ वर्षे, २२७ दिवस
शुबमन गिल – २३ वर्षे, २५७ दिवस
हेही वाचा – GT vs MI : रोहितचा रणसंग्राम: IPL प्लेऑफमध्ये मोडला स्वतःचाच ४ वर्षांपूर्वीचा खास विक्रम
साई सुदर्शन आता स्पर्धेच्या इतिहासात एका हंगामात ७५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा फक्त पाचवा फलंदाज ठरला आहे. या प्रकरणात, त्याने विराट कोहली, जोस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर सारख्या दिग्गजांच्या क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
आयपीएलच्या एका हंगामात ७५० पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज:
९७३ – २०१६ मध्ये विराट कोहली
८९० – २०२३ मध्ये शुबमन गिल
८६३ – २०२२ मध्ये जोस बटलर
८४८ – २०१६ मध्ये डेव्हिड वॉर्नर
७५९ – २०२५ मध्ये साई सुदर्शन





