Sagar Dhankar Murder Case : सुशील कुमारला जामीन मंजूर, पण…
Updated On:

नवी दिल्ली – युवा कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला अखेर जामीन (Court grants interim bail to Sushil Kumar) मंजूर झाला असून, त्याची तिहार जेलमधून सुटका करण्यात आली आहे.
सुशील कुमारची पत्नी आजारी असून, तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे, यामुळे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. सागर हत्याकांडात सुशील कुमारसह एकूण 18 आरोपींचा समावेश असून, त्याला येत्या 12 नोव्हेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे.
Sagar Dhankar Murder Case : ऑलिम्पिकपटू सुशीलकुमारला एक चूक महागात पडली; करिअर आणि आयुष्य बरबाद
त्याची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले असल्याने जामीन मंजूर केला जात आहे. जामिनाची मुदत संपताच सुशील कुमारला 13 नोव्हेंबर रोजी हजर व्हावे लागणार आहे.





