Olympic Medalist Sushil Kumar। दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने सुशीलकुमार यांचा अखेर जामीन रद्द केला आहे. त्यासोबतच सुशील कुमार यांना एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. सुशील हा ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखरच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. सुशीलला मे २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या आदेशानुसार तो मार्चपासून जामिनावर बाहेर आहे. समोर आलेल्या बातमीनुसार, सागर धनखड यांचे वडील अशोक धनखर यांच्या अपीलावर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सुशील कुमार यांना जामीन देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला अशोक धनखर यांनी आव्हान दिले होते. सुशील कुमार यांना जामीन देताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते की खटला सुरू झाल्यापासून तीन वर्षांत १८६ पैकी फक्त ३० साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. Olympic Medalist Sushil Kumar। साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप करत अशोक धनखड यांनी जामिनाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. असा युक्तिवाद करण्यात आला की सुशील कुमार यांना यापूर्वी अंतरिम जामिनावर सोडण्यात आले तेव्हा त्यांनी एका प्रमुख साक्षीदाराला धमकावले होते. सुशील कुमार आणि इतरांवर मे २०२१ मध्ये मालमत्तेच्या वादातून सागर धनखडवर खुनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सागर धनखडचे दोन मित्रही जखमी झाले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, सागर धनखडच्या डोक्याला घन वस्तूने मारल्याने गंभीर दुखापत झाली होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये, ट्रायल कोर्टाने सुशीलविरुद्ध आयपीसी अंतर्गत आरोप निश्चित केले होते, ज्यामध्ये प्राणघातक शस्त्राने खून करणे, गुन्हेगारी कट रचणे, धमकी देणे आणि दंगल करणे, शस्त्रास्त्र कायद्यासह आरोप समाविष्ट होते. Olympic Medalist Sushil Kumar।